छत्रपती शिवाजी महाराज माहिती | Chh Shivaji Maharaj Information in marathi
Shivaji Maharaj Information in marathi : नमस्कार मित्रांनो या नश्वर आयुष्यात एक गोष्ट शाश्वत आहे, आणि ती म्हणजे ज्ञान मित्रांनो बदलत्या काळानुसार ज्ञानाच्या स्वरूपात बदल होत चालला आहे. पूर्वी मौखिक स्वरूपात मिळणारे ज्ञान हळूहळू पुस्तकांमध्ये शब्दबद्ध झाले मात्र हल्लीच्या धावपळीच्या युगात ज्ञान हे आपल्या अगदी तळहातावर आली आहे. आणि याच बदलत्या काळानुसार आम्ही आपणास आपल्या या वेबसाईटच्या द्वारे ज्ञानरूपी शिदोरी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
मित्रांनो आपल्याला आयुष्यात काहीतरी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावण्याचे काम प्रेरणास्त्रोत करत असतात. प्रत्येकासाठी हे प्रेरणा स्त्रोत वेगवेगळे असले तरीही अखंड महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचा कधीही न आटणारा झरा आहेत. आजच्या आपल्या या लेखांमध्ये आपण श्रीमंतयोगी राजधिराज असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.
Table of Contents
शिवजन्मपूर्व महाराष्ट्र
मित्रांनो ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना आपल्या सर्वप्रथम त्या कालखंडापूर्वीची पार्श्वभूमी ही जाणून घेणे महत्त्वाचे असते. मित्रांनो अन्याय अत्याचाराला आज सहजच शब्दप्रयोग केला जातो. की मोगलाई माजली की काय मोगलाई म्हणजेच शिवजन्म पूर्वी म्हणजे सोळाव्या आणि सतराव्या शतकाच्या दरम्यान भारत भूमीत मुघलांची सत्ता होती असे असले तरीही, ही राजासत्ता जनतेसाठी थोडीदेखील तसदी घेत नसे.
याउलट जनतेवर अन्याय अत्याचार करून जनतेची लुबाडणूक करणे ही तर या राज्यांची ओळख होती मात्र छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ प्रांतातील सवंगड्यांसोबत या वाईट शक्तींचा पराभव करत आदिलशाही निजामशाही कुतुबशाही त्याचप्रमाणे युरोपियन डज फ्रेंच यांसारख्या राजसत्त्यांचा मुस्क्या आवळल्या.
शिवजन्मोत्तर महाराष्ट्र
मित्रांनो अखिल महाराष्ट्र ज्या व्यक्तिमत्त्वाला दैवताप्रमाणे पुजतो. अशा या छत्रपती शिवरायांचा जन्म शहाजीराजे भोसले आणि शिवमाता जिजाबाई भोसले यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 या मंगलमय दिवशी जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. स्थानिक मार्गदर्शकाच्या माहितीनुसार शिवनेरी या किल्ल्याच्या नावावरून शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले.
मात्र काही लोक सांगतात की माता जिजाऊ यांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या मंदिरात प्रार्थना केली की माझ्याकोटी बलवान पुत्र जन्माला येऊ दे व माझ्या मराठी रयतेला या जुलमी मोघलांच्या सत्तेपासून सुटका करू दे व यानुसारच मा जिजाऊ यांनी शिवरायांचे नाव शिवाजी ठेवले असे देखील सांगितले जाते
मित्रांनो मराठीत एक म्हण रूढ आहे कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा यानुसारच आपल्या पूर्वजांच्या लढाऊ वारसांच्या अनुषंगानेच छत्रपती शिवाजी महाराज देखील धुरंधर योद्धा होते ते भोसले या लढवय्या कुटुंबातील मराठा राजा होती
छत्रपती शिवरायांचे वडील आणि आजोबा दोघेही आपल्या काळातील प्रचंड साहसी लढवय्ये होते शिवरायांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले हे अहमदनगर येथील निजामशहाच्या दरबारी सरदार पदी होते त्यांच्या कर्तबगारिवर खुश होऊन निजामशहाने त्यांना राजा ही पदवी बहाल केली होती
सोबतच त्यांना इंदापूर पुणे चाकण आणि सुपे इत्यादी प्रदेशांची देशमुखी देखील देण्यात आलेली होती सोबतच शिवनेरीसारखा अभेद्य किल्ला देखील त्यांना प्रशासन करण्यासाठी देण्यात आलेला होता मालोजी राजांच्या पाठोपाठ श्री शहाजीराजे भोसले देखील विजापूरच्या दरबारी पदस्थ झाले व आपल्या हिमतीच्या जोरावर त्यांनी विजापूरच्या दरबारी पुण्याची जहागिरी मिळविली.
स्वराज्य स्थापनेची गोडी
मित्रांनो वाईट दिवसांचे चटके सोसल्याशिवाय चांगले दिवस आणण्याची इच्छा उत्पन्न होत नाही याचप्रमाणे शिवराय देखील बालपणापासून यवनी मोघलांच्या जाच आणि जुलमांचे फटके बघत आली होते आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये कुठेतरी स्वराज्य स्थापनेची इच्छा प्रबळ होत गेली मा जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या शिवरायांवर शहाजीराजांच्या कर्तबगारीचा देखील प्रभाव होता
नागरिकांवर होणारे अनन्वित अत्याचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती म्हणून अगदीच मुठभर बालसंगड्यांना सोबत घेऊन वयाच्या फक्त 16 व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यावेळी त्यांनी रायरेश्वरावर आपल्या करंगळीच्या रक्ताचा अभिषेक करून या जुलमी मोघलांचा पराभव करून जनतेचे स्वराज्य उभा करण्याची शपथ घेतली या कार्यात छत्रपतींचे सवंगडी सूर्याजी काकडे तानाजी मालुसरे नरप्रभू गुप्ते सोनोपंत डबीर बाजी पासलकर कान्होजी जेधे सूर्याजी मालुसरे बापूजी मुदगल यांसारख्या धुरंदर धर्मयोद्धांची साथ लाभली
पहिली यशस्वी मोहीम
मित्रांनो सोळाव्या शतकात किल्ले म्हणजे राजांच्या सामर्थ्याची ओळख समजली जात ज्या राजाकडे जेवढे जास्त किल्ले तेवढा तो राजा सामर्थ्यवान असे समजले जाईल यासाठी स्वराज्य स्थापन करायचे म्हटलं तर पहिल्यांदा किल्ले हस्तगत करणे हे महत्त्वाचं काम होतं शिवरायांनी अगदी कुठलीही अपेक्षा न ठेवता जीवाला जीव देणाऱ्या मावळ प्रांतातील सहकाऱ्यांची अभेद्य अशी फौज उभारली व त्यांच्या मदतीने पहिल्या मोहिमेची आखणी केली यानुसार त्यांनी सर्वप्रथम तोरणा हा भक्कम किल्ला जिंकून घेतला जणू या तोरणाच्या रूपात स्वराज्याच्या मतकार्याची तोरणच उभारले गेले असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही
स्वराज्य स्थापनेची घोडदौड
मित्रांनो अगदीच शून्यातून स्वराज्य स्थापन करणे ही काही सामान्य बाब नव्हे यासाठी शिवरायांनी आपल्या ऐन उमेदीची पन्नास वर्षे झिजवली या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शिवरायांनी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली अनेक किल्ले जिंकूनही घेतले तसेच स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या किल्ल्यांची देखील केली जणू शिवरायांनी जनतेच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य वाहिले होते स्वराज्याचा विस्तार आता चांगलाच रुंदावला होता
स्वराज्य खानदेशापासून दक्षिणेत कर्नाटकच्या तंजावर पर्यंत तर कोकणच्या अरबी समुद्रापासून उगवतीस नागपूरच्या पलीकडेही स्वराज्याचा विस्तार झालेला होता त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक साहसी मोहिमा आखल्या आणि त्या तडीसही नेल्या पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून यशस्वी सुटका करून विशाल गडास कूच करणे असो की अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी कोसळविणे असो उत्तरेस आग्र्यावरून सुटका करून यशस्वी होणे असो की सुरत बाजारपेठेची लूट असो स्वराज्यातीलच सुखी यांचा पराभव असो की अगदी दक्षिणेकडीलही मोहिमा असो शिवरायांनी प्रत्येक प्रसंगातून आपल्या सामर्थ्याची ओळख अवघ्या जगाला करून दिली होती
त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आजही सच्चा शिवभक्ताला अंगावर शहारे आणल्याशिवाय सोडत नाहीत शिवरायांनी आपले आयुष्य झिजवून हे जनतेसाठीचे जनतेचे स्वराज्य उभे केले होते स्वराज्यात प्रजा अगदी आनंदाने नांदत होती आयुष्याच्या खडतर वाटेतून प्रवास काढूनही जनतेचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच जन्माला यावे लागते
Also read :
- 200+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | shivaji maharaj quotes/Status in marathi
- छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh
मित्रांनो छत्रपती शिवराय आयुष्यभर स्वराज्यासाठीच झटत राहिले दरम्यानच्या काळात मासाहेबांची निधन असू की पत्नी सईबाई यांची निधन शिवरायांना शोक करण्यासही वेळ मिळाला नाही त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत वाऱ्याप्रमाणे घोडदौड करत स्वराज्याची प्रतिमा सात समुद्रा पार पोहोचवली
शिवरायांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर शिवरायांना अनेक पत्नी होत्या महाराजांनी पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्यासोबत केला त्यानंतर सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर सकवार बाई गायकवाड काशीबाई जाधव सगुनाबाई शिंदे गुणवंतीबाई इंगळे लक्ष्मीबाई विचारे यादेखील शिवरायांच्या पत्नी होत्या राणी सईबाई यांच्यापासून शिवरायांना संभाजी महाराज तर सोयराबाईंपासून राजाराम महाराज असे दोन पुत्र होते
सोबतच शिवरायांना कन्यारत्न देखील होते सईबाईंनी 1659 मध्येच आजारपणाच्या कारणास्तव देह त्याग केला तर काशीबाई यांनी शिवराज्याभिषेकापूर्वी अखेरचा श्वास घेतला 1680 मध्ये शिवरायांचे निधन झाले तेव्हा पुतळाबाई शिवराय यांच्यासोबत सती गेल्या तर शिवरायांच्या निधनानंतर सोयराबाई आणि सकवराबाई यांचे निधन झाले
मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय चाणक्य मुत्सद्दी आणि हुशार होते आपल्या मुठभर सैन्याच्या जोरावरच त्यांनी गनिमी कावा वापरून मोगली सत्तेच्या बलाढ्य पूजेला सळुकी प्रयोग करून सोडले होते प्रत्येक मोहिमेकरिता त्यांच्याकडे अनेक योजना तयार असत त्यामुळे वेळप्रसंगी शत्रूही बुचकाळ्यात पडत असे आणि अशा शत्रूवरून विजय मिळवणे शिवरायांना सोपे जाईल सह्याद्रीचा घाटमाथ्याचा आणि डोंगराळ भागाचा उपयोग शिवरायांनी गनिमांच्या फौजेला ठेचून काढण्यासाठी पुरेपूर करून घेतला
शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक अर्थातच फादर ऑफ इंडियन नेव्ही या विरोधाने संबोधले जाते याचे कारण म्हणजे त्यांनी अभेद्य अशी समुद्री फौज देखील तयारी केली होती बरोबरच त्यांनी स्वराज्यासाठी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली होती व नौदलही उभारले होते
50 वर्षाच्या आयुष्यात छत्रपतींनी मोठे साम्राज्य उभे केले होते छत्रपतींनी 3 एप्रिल 1980 या दिवशी वैकुंठ लोकास मार्ग क्रमांक केले पन्नास वर्षे अविरत जनतेच्या कल्याणासाठी धगधगणारी ही तोफ अखेरीस थंडवली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे अनन्य साधारण असे आहे याची परतफेड आपण कुठल्याही रूपात करू शकत नाही अशा या जगात वंदनीय छत्रपती शिवरायांना त्रिवार मुजरासह मानाचे वंदन जय जिजाऊ, जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील काही पुस्तके
शिवरायांचे आठवावे रुप…शिवरायांचा आठवावा प्रताप. छत्रपती शिवाज महाराज ही महाराष्ट्राला लाभेल एक आराध्य दैवत आहे आणि शिवाजी महाराजांच्या बऱ्याच गाथा ह्या येत्या सर्व पिढ्यांना प्रेरित करत आल्या आहेत. शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा या सर्वांना कळाव्या यासाठी महाराजांवर साहित्य लिहली गेली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या प्रत्येक गाजलेला पराक्रम तसेच त्यांच्या मावळ्यांप्रति असलेले प्रेम आणि तसेच लोक कल्याण पर्यंत या सर्व गोष्टींची नोंद या साहित्यांमध्ये करण्यात आलेली आहे. महाराजांविषयी असलेले तुमचे ग्रुप निष्ठा प्रेम आणि त्या बद्दल अभ्यासबद्ध करण्यासाठी तुम्ही शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचायला हवे.
खालील दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिण्यात आली काही साहित्य आहेत. तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके नक्कीच मदत करतील.
१. श्रीमान योगी
२. शिवचरित्र
३. शककर्ते शिवराय खंड 1, 2
४. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज
५. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
६. गनिमी कावा
७. उद्योजक शिवाजी महाराज