व्यवसाय कर्ज योजना मराठी | Business Loan Scheme in Marathi
Business Loan Scheme in Marathi: नमस्कार मित्रांनो, ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या ज्ञानाच्या अखंड प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आजकाल शिक्षण पूर्ण झालं की, वेद लागतात ते नोकरीचे किंवा उत्पन्नाचे साधन निर्माण करायचे. यासाठी अनेक तरुण स्पर्धा परीक्षा देतात तर अनेक तरुण डिग्रीच्या धरतीवर इंटरव्यू देऊन नोकरीच्या शोधात असतात. पण सध्या व्यावसाय करणे अर्थातच बिझनेस मध्ये रस असणारे अनेक तरुण-तरुणी आपल्याला सभोवताली पाहायला भेटतात. याचं कारण आहे ते वाढती लोकसंख्या व त्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा यामुळे व्यवसायाला खूप मागणी आहे.
पण व्यवसाय करणे ही काही सोपी गोष्ट नाही यासाठी मनुष्यबुद्धी ही तितकीच प्रगल्भ व मन ही तितकेच खंबीर ठेवावे लागतं. व्यवसायामध्ये फक्त नफाच होतो असे नाही तर अनेक वेळा तोटाही सहन करावा लागतो. शून्यातून विश्व निर्माण करता आलं म्हणजे आपण व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहोत असा त्याचा अर्थ होतो .बिझनेस किंवा व्यवसाय करण्यासाठी अंगी अनेक गुण असावे लागतात. प्रत्येकालाच ते शक्य नसते. यात बिजनेस करणाऱ्याला मोठी जोखीम देखील घ्यावी लागते. त्यामुळे जर व्यवसाय करायचा असेल तर त्याबाबतचा निर्णय हा विचारपूर्वकच घ्यावा लागतो.
व्यवसाय करण्याचा विचार मनात आला की, पहिला प्रश्न आपल्या मनात घर करतो तो म्हणजे व्यवसायासाठी भांडवल कुठून उभे करायचे. यासाठी आता सरकारने देखील अनेक योजनांमार्फत नागरिकांना सहकार्य करण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक योजना सरकार सध्या व्यवसायासाठी राबवत आहे .जलदरीतीने व्यवसायासाठी कर्ज मिळावे व त्यासाठी फाईल भरून कागदपत्र गोळा न करता केवळ नागरिकाचे आधार पाहून त्याला कर्ज मिळेल अशा देखील अनेक योजना सध्या सरकार राबवत आहे.
तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण व्यवसायासाठी कर्ज कसे प्राप्त करावे हे पाहणार आहोत.याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल.तर कर्ज घ्यावयास लागणारी कागदपत्रे, व्याजदराबाबतची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या या लेखाला!!!
Table of Contents
Business Loan/व्यवसाय कर्ज म्हणजे नक्की काय?
व्यवसाय कर्ज हे कोणत्याही छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी घेतले जाऊ शकते. जर तुम्हाला एखादे छोटेसे कपड्याचे दुकान जरी सुरू करायचे असेल किंवा एखाद्या मोठ्या दुकानाची डिस्ट्रीब्यूटरशिप जरी घ्यायची असेल तरी देखील तुम्ही बिझनेस लोन घेऊ शकता. बऱ्याच वेळा असे होते की, आपल्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल असते. आपण व्यवसाय सुरू देखील करतो .पण तो व्यवसाय वृद्धिंगत झाल्यावर तो पुढे वाढवण्यासाठी आपल्याला बिझनेस लोन ची देखील गरज पडू शकते.
तुम्ही हे लोन बँकेकडून किंवा पतसंस्थेकडून देखील घेऊ शकता. पण अशा संस्था जेव्हा व्यवसायिक कर्ज देत असतात. तेव्हा त्या व्यक्तीबद्दल सर्व माहिती आधी विचारात घेतात व त्यावर विचार विनिमय करून त्या संस्थेचे वरिष्ठ कर्ज द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेत असतात .
जगातली कोणतीही बँक असो किंवा वित्तीय संस्था असो ती पुरेशी माहिती घेतल्याशिवाय बिजनेस लोन देत नाही. सर्वप्रथम म्हणजे ज्या व्यक्तीला कर्ज दिले जाते तो व्यक्ती ते वेळेत कर्ज फेडू शकतो का? याची तपासणी केली जाते .त्याची उत्पन्नाची स्त्रोत तपासली जातात एवढं करून देखील जर त्याचा व्यवसाय बुडाला किंवा उत्पन्नाचे स्त्रोत नाहीसे झाले तर जोखीम म्हणून काय उपाययोजना करता येतील या सर्व बाबींचा विचार व्यावसायिक कर्ज देताना करावा लागतो.
सरकारी योजना अंतर्गत दिली जाणारे व्यावसायिक कर्ज
एमएसएमई MSME अर्थातच मिनिस्ट्री ऑफ मायक्रो मिडीयम अँड स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजेच यामध्ये लघु उद्योग कर्ज, मध्यम उद्योग कर्ज व छोट्या व्यावसायिकांना दिले जाणारे कर्ज असे प्रकार पडतात. जर नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर नवीन स्टार्टअप साठी आणि लघु उद्योगासाठी सरकारच्या काही विशेष योजना देखील आहेत .
त्यांची नावे आपण पाहूयात.
- मुद्रा लोन.
- स्टैंड अप इंडिया.
- कॉलर उदयमी योजना.
- बँक क्रेडिट सुविधा.
नाबार्ड सरकारी किंवा गैरसरकारी स्त्रोतांकडून घेतले जाणारे व्यावसायिक कर्ज हे पुढील घटकांद्वारे घेतले जाते.
- टर्म लोन
- वर्किंग कॅपिटल लोन
- स्टार्टअप लोन
- चालान वित्तपोषण
- उपकरण वित्तपोषण
- ओव्हर ड्राफ्ट इत्यादी.
महिला व्यावसायिकांसाठी दिले जाणारे कर्ज–
आज-काल महिला कुठेही मागे राहिलेल्या नाहीत अगदी व्यवसाय करतानाही महिला आघाडीवर आहे.आपण अनेक फूड स्टॉल्स किंवा खाजगी व्यवसाय पाहतो .जिथे महिलांचे वर्चस्व असते. आज-काल अनेक मोठमोठे हॉटेल्स देखील महिलांमार्फत अगदी यशस्वीरित्या चालवली जातात. त्यामुळेच सरकार देखील बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक कर्जामध्ये महिलांचा विशेष विचार करते .यासाठी सरकार व अनेक खाजगी वित्तीय संस्था महिलांसाठी विशेष सवलतीत कर्ज उपलब्ध करून देतात.
NBFCs नामक संस्थानी महिलांसाठी अनेक अशा खास योजना राबवल्या आहेत.
- सेंट कल्याणी स्कीम.
- स्त्री शक्ती पॅकेज.
- देना शक्ती स्कीम.
- उद्योगिनी स्कीम.
- महिला उद्यम निधी स्कीम
- इत्यादी…..
व्यावसायिक कर्जासाठी आवश्यक असणारी पात्रता–
कोणतीही सरकारी किंवा खाजगी बँक जेव्हा तुम्हाला एखादं कर्ज देते तेव्हा ती तुमच्यासमोर काही अटी शर्ती ठेवत असते. त्या अटी शर्तींची जर तुम्ही पूर्तता केली तर तुम्हाला सहजरित्या कर्ज मिळते. सर्वप्रथम बँक हे तपासते की तो व्यक्ती कर्जफेडू शकेल का? व त्याची सर्व उत्पन्नाची साधनं देखील बारकाईने तपासली जातात. त्याच्या उत्पन्नाची विशेष नोंद घेतली जाते .कोणत्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे आहे हे तपासले जाते व कर्ज दिल्यानंतर बँकेचे काही अधिकारी नक्की तो व्यवसाय सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी येत असतात. म्हणजेच त्यांनी दिलेला पैसा हा त्याच व्यवसायासाठी वापरला जातोय का हे देखील तपासले जाते.
याचबरोबर खालील सर्व अटींची पूर्तता कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला पूर्ण कराव्या लागतात.
१.कर्ज घेणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असावा.
२.बँकेत कर्ज मागण्यासाठी गेल्यावर व्यवसायाचा संपूर्ण आराखडा बँकेला कळवावा लागतो.
३. नागरिकाचे वय हे 18 ते 35 वर्षाच्या मध्ये असावे लागते.
४. सुरू असलेल्या व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा व्यवसाय हा किमान तीन वर्ष जुना असावा
५. सरकारने किंवा बँकेने ठरवून दिलेली उत्पन्नाची मर्यादा दरवर्षी त्या व्यवसायाने गाठली पाहिजे.
६. त्याचबरोबर यापूर्वी जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले असेल तर त्या बँकेने तुम्हाला डिफॉल्टर घोषित केलेले नसावे.
या सर्व पात्रता त्या व्यक्तीने धारण करणे आवश्यक आहे .
Also Read :
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती | Mudra Loan Information in Marathi
- वैयक्तिक कर्ज संपूर्ण माहिती | Personal loan information in marathi
- [2023] सोनेतारण कर्ज मराठी माहिती | Gold loan information in Marathi
- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? Term insurance information in Marathi
व्यवसाय कर्जासाठी गरजेची असणारी सर्व कागदपत्रे–
कोणतेही अधिकृत ओळखपत्र त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र ,रेशन कार्ड किंवा पासपोर्टचा देखील वापर करू शकता .
आर्थिक उत्पन्न दाखवणारी कागदपत्रे जसे की, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलेली किमान तीन वर्षांपूर्वीची कागदपत्रांची फाईल .
किमान तुमच्या व्यवसायाची दोन वर्षांची बॅलन्स शीट .जर तुमचा व्यवसाय हा दोन-तीन व्यक्तींच्या भागीदारीमध्ये असेल तर त्यासाठी पार्टनरशिप डीड असणे आवश्यक आहे.
ज्या प्रकारचा तुमचा व्यवसाय आहे म्हणजेच तुमचा व्यवसाय लघु उद्योग व्यवसाय आहे. मध्यम उद्योग व्यवसाय आहे की ,मोठा व्यवसाय आहे. यानुसार कर्ज दिले जाते. अगदी 10000 पासून 50000 पर्यंत तसेच करोडोंमध्ये देखील कर्जाची किंमत असते. कर्ज घेण्यासाठी तुमचे क्रेडिट प्रोफाइल हे चांगले असणे खूप आवश्यक असते .
व्यावसायिक कर्जासाठी असणारी व्याजाची टक्केवारी–
जर तुम्ही व्यावसायिक कर्ज एखाद्या सरकारी योजनेअंतर्गत घेत असाल तर तुम्हाला व्याजदर हे अगदी माफक असते .व्याजदर हे प्रत्येक योजनेनुसारच बदलत राहते. सरकारी योजनेअंतर्गत व्यावसायिक लोन घेतल्यास व्याजदर कमी लागते, पण जर एखाद्या खाजगी बँकेकडून तुम्ही लोन घेत असाल तर व्याजदर हे अधिक लागते. खाजगी बँकांमध्ये तुम्हाला अगदी कमी वेळेत व खूप जलद गतीने कर्ज मिळते .मात्र सरकारी बँकांमध्ये किंवा योजनेअंतर्गत कर्ज घ्यावयास थोडा उशीर लागतो.
त्यामुळे व्याजदर हा तुम्ही कुठून कर्ज घेत आहात यावर देखील बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. जर तुम्ही कर्ज घेतले तर व्याजाचा दर हा सुरुवातीपासून ते कर्ज संपेपर्यंत समानच राहत असतो. तर व्यावसायिक लोन साठी व्याजदर हा 13% ते 48 टक्क्यांच्या दरम्यान पहावयास मिळतो .
व्यवसाय कर्जाची संपूर्ण प्रक्रिया–
व्यवसाय लोन घेण्याचे ठरवल्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेमध्ये जाऊन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा बँक मॅनेजरची भेट घेऊन त्यांना संपूर्ण व्यवसायाची माहिती व व्यवसायाचा आराखडा सादर करावा लागतो .त्याचबरोबर तुमची सर्व उत्पन्नाची साधने त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर बँक अधिकारी विचार विनिमय करून तुम्हाला कर्जासाठीचा असलेला फॉर्म देउ करतात. तो फॉर्म भरल्यानंतर संबंधित सर्व कागदपत्रे कायदेशीर रित्या जोडल्यानंतर बँकेकडून तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावले जाते .सर्व तपासून झाल्यानंतर काही दिवसानंतर लोनची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते .
काही बँका या हप्त्याहप्यांमध्ये लोन देउ करतात तर काही एक रकमी कर्ज देऊ करतात.
बँक लोन साठी सिबिल स्कोरची आवश्यकता–
व्यावसायिक लोन हा एक वेगळा भाग झाला पण तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कोणतेही कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यासाठी तुमचा सिबिल स्कोर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. तुमचा जर क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुम्हाला बँके कडून कर्ज दिले जात नाही .750 हुन अधिक सिबिल स्कोर असणे हे खूप गरजेचे आहे .प्रत्येक बँक ही नागरिकाचा सिबिल स्कोर चेक करूनच कर्ज द्यायचे की नाही हे ठरवत असते. जितका तुमचा सिबिल स्कोर चांगला असतो तितक्याच आकर्षक पद्धतीने बँक तुम्हाला व्याजदर देउ करते.
तर मित्रांनो व्यावसायिक कर्जाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा.
धन्यवाद!!!