माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध । My favourite season Shravan essay in Marathi
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.
तर आज आपण बघूया ‘माझा आवडता महिना श्रावण’ [maza avadta mahina shravan essay in marathi]
या विषयावरील निबंध.
माझा आवडता महिना श्रावण
‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ असे श्रावण महिन्याला म्हटले आहे ते काही वावगे नाही. असा हा श्रावण सगळीकडे हिरवा गालिचा पसरतो.
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’
श्रावणात धो-धो पाऊस पडतोय म्हणून छत्री, रेनकोट घेऊन निघावे तर क्षणात उन्हाचा पट्टा पडलेला दिसेल. कधीकधी तर उन्हातच पाऊस पडू लागेल त्यामुळे मुले यातच गाणी म्हणत नाचू लागतील. असा हा श्रावण हरिततृणांचा, मखमालिचा गालिचा पसरुन आपल्या मनालाही उल्हासित बनवतो. थंडगार हवेचे झोत आणि टपोऱ्या थेंबाचे सिंचन पहायला नयनरम्य वाटते. जिकडेतिकडे मृदगंध दरवळतो. जमिनीचा ताप सरुन मनालाही गारवा जाणवतो.
श्रावणात पारिजातक, जाईजुई अशा कितीतरी फुलांना बहर येतो. सारा परिसर हरितमय बनून जातो. श्रावणात कधी कधी कोकिळेचे मधुर कुजनही कानी पडते. श्रावणात मोर आपला सुंदर पिसांचा पिसारा फुलवून आनंदाने नाचू लागतो. जणू काही मेघराजाचे स्वागतच करतो. श्रावणातल्या सकाळी सगळीकडे दाट धुकं पसरलेलं असत. पावसाचे थेंब झाडांच्या पानांवर मोत्यासारखे चमकतात. त्याची शोभा अवर्णनीय आहे.
श्रावण म्हटले की निरनिराळ्या सणांची रेलचेल असते. रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी असे सण असल्याने त्या निमित्ताने सर्व नातेवाईकांच्या भेटी होतात. बहिणी भावाला राखी बांधतात. नागपंचमीला नागराजाला रक्षण करण्याचे आवाहन करतात. गोकुळाष्टमीला तर सर्वचजण आनंदी असतात. आपल्या बालकृष्णाचा जन्मदिन उंच-उंच दहीहंड्या बांधून आणि फोडून साजरा करतात. १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सणही श्रावण महिन्यातच येतो.
सणांच्या निमित्ताने शाळा-कॉलेजांना सुटी असते. घरी निरनिराळे गोडधोड पदार्थ बनवले जातात. बाजारातून मिठाया आणल्या जातात. अभ्यास आणि परीक्षेची कटकट नसते. श्रावणात आकाशातही इंद्रधनुची मजा काही आगळीच भासते. त्याचे प्रतिबिंब रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यातही पहायला मिळते. हे पाहताना भान हरपून जाते. असा हा मनोवेधक नि चित्ताकर्षक सर्व चराचर सृष्टिला आवडणारा श्रावण कोणाला आवडणार नाही ?
तुम्हाला हा ‘माझा आवडता महिना श्रावण’ या विषयावरील निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
हे पण वाचा
५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा संदेश पहा marathicharoli.in वर .
4 Comments