| |

{Essay} महात्मा गांधी मराठी निबंध । Mahatma Gandhi Essay In Marathi

महात्मा गांधी मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.

तर आज आपण एका थोर देशभक्त महात्मा गांधी यांच्यावर मराठी निबंध बघणार आहोत.

महात्मा गांधी मराठी निबंध

महात्मा गांधी मराठी निबंध

आपल्या देशात अनेक थोर नेते होऊन गेले. त्यांचे कार्य आणि बलिदान आपल्याला आजही स्मरणात आहे. महात्मा गांधी आपल्या देशातच नव्हे तर साऱ्या जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. गुजरात राज्यातील पोरबंदर या शहरात त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. लहानपणापासूनच हळव्या स्वभावाचे असणारे गांधी देशभरातील हिंसा, जातिभेद, वर्णभेद आणि दंगेधोपे यामुळे आणखीनच करुणामय झाले.

गांधीजींचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झाले. नंतर इंग्लंडमध्ये राहून त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली. काही काळ ते आफ्रिकेत राहिले. तेथील वर्णभेदामुळे भारतीयांवर होणारा अन्याय त्यांना सहन झाला नाही. ते नेहमी वंशभेदाविरुद्ध झगडत राहिले. शेवटी त्यांना यश प्राप्त झाले. भारतात आल्यावर ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध लढले. त्यासाठी त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसा ही दोन हत्यारे वापरली. गांधीजींचे राजकीय गुरु भारतसेवक समाजाचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले हे होते.

गांधीजींनी आपले आयुष्य साबरमती आश्रमात व्यतित केले. पत्नी कस्तुरबा यांचा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा होता. गांधीजी नेहमी स्वदेशी कपडे वापरत. ते खादीचा पुरस्कार करत. त्यासाठी ते स्वतः चरख्यावर सूत कातत. त्यासाठी त्यांनी ‘चरखा’ घरोघरी पोहचवला. आश्रमात राहून त्यांनी सर्वाना स्वावलंबनाचे धडे दिले. स्वतःचे काम स्वतः करण्यात कसली लाज ? असा त्यांचा सवाल असे.

आपल्या देशातील गरीब आणि दलित लोकांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. स्वकीयांना अंगभर वस्त्रेही मिळत नव्हती हे पाहून गांधीजी साधे धोतर व अंगावर पंचा अशी वस्त्रे वापरत. खादीप्रसार आणि ग्रामसुधार याविषयी त्यांनी सतत पाठपुरावा केला. आपला भारत देश खेड्यांचा देश आहे. ८०% लोक खेड्यात रहातात. त्यामुळे देशाचा विकास साधायचा असेल तर ‘खेड्यांकडे चला’ असा त्यांचा संदेश होता. लोक त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणत. स्वातंत्र्यानंतर त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले गेले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते तनमनाने लढले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक देशवासी स्वातंत्र्याचा हा सोहळा उपभोगत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी एका माथेफिरुने त्यांची हत्या केली. संपूर्ण देश दुःख सागरात बुडुन गेला. देशभर शोककळा पसरली. गांधीजी हे सत्य, अहिंसा, प्रेम आणि मानवतावाद यांचे पुजारी होते.

तुम्हाला हा महात्मा गांधी मराठी निबंध या विषयावरील निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

हे पण वाचा  :

५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध

स्वामी विवेकानंद मराठी निबंध 

माझी आई मराठी निबंध

माझा आवडता शिक्षक मराठी निबंध.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *