[Eassy] स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध | Essay on savarkar in marathi
स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.
तर आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील मराठी निबंध.
स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध
‘जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले’
आधाडीचे क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक आणि भाषाशुध्दी व लिपीशुध्दीचे पुरस्कर्ते विनायक दामोदर सावरकर हे नाशिकजवळील भगूर या गावी जन्मले. नाशिक येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर सासरे रामचंद्र चिपळूणकर यांच्या साह्याने ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाले. १९०६ साली श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले.
लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्वातंत्र्यवीरांना सामुग्री पुरवण्यासाठी इंडिया हाऊसची स्थापना केली होती. तिथे राहून ते अभ्यास करत आणि १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाचा वाढदिवस, शिवजयंती यासारखे उत्सव साजरे करण्यात पुढाकार घेत. पुढे वडीलबंधू बाबाराव सावरकर यांच्या साह्याने त्यांनी ‘मित्रमेळा’ नावाची संघटना उभी केली. त्यातील देशभक्तीपर गीतांबद्दल त्यांना इ.स.१९०९ साली जन्मठेपेची शिक्षा झाली. पुढे २१ डिसेंबर १९०९ साली नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून झाला. या खुनाशी संबंधित क्रांतिकारी लोकांना पिस्तुल पुरवल्याचा आरोप ठेऊन सावरकर लंडनला येताच त्यांना अटक करण्यात आली.
आगबोटीतून हिंदुस्थानात आणत असताना त्यांनी शौचकूपाच्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी घेतली व किनारा गाठला. पुन्हा त्यांना अटक झाली. हिंदुस्थानात आणल्यावर त्यांच्यावर खटले भरुन त्यांना दोन जन्मठेपींची शिक्षा झाली. काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानात झाली. त्याचवेळी “पन्नास वर्षे इंग्रजी राज्य टिकेल काय ?” असा धाडशी सवाल त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना उद्देशून केला. अंदमानातून यमयातना भोगून झाल्यावर त्यांना हिंदुस्थानात परत आणण्यात आले. आणि येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. पुन्हा रत्नागिरीस स्थानबद्ध करण्यात आले.
रत्नागिरीत असताना सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजने सुरु ठेवली. तसेच भागोजी कीर यांच्याकडून पतितपावन मंदिर बांधून घेऊन अस्पृश्यांसाठी खुले केले. मायभूमीसाठी सावरकरांना असणारी तळमळ ते लंडनमध्ये शिकायला असताना त्यांनी रचलेल्या एका काव्यातून व्यक्त होते. सागराला उद्देशून सावरकर म्हणतात,
“ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला”
तुम्ही हा निबंध खालील विषयांवर वापरू शकता :
Essay on savarkar in marathi
स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध
Veer savarkar essay in marathi
स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी
हे पण वाचा :
५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध
लालबहादूर शास्त्री मराठी निबंध
झाशीची राणी – लक्ष्मीबाई मराठी निबंध
3 Comments