{2024} Rakshabandhan wishes in marathi | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा..

‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

भाऊ बहिणींमधील प्रेमाचे बंधन साजरे करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. भावंडे मिठाई आणि भेटवस्तूंची देवाण घेवाण करतात त्यामुळे हा सण खूपच उत्साहाने भरलेला असतो. रक्षाबंधन हा भारतीय सनांपैकी एक लोकप्रिय सण आहे. रक्षाबंधन हा दिवस भाऊ बहिणींमधील अविश्वसनीय बंधन साजरा करणारा मानला जातो.



रक्षाबंधन आता अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय.यंदा बहिणीला गिफ्टपेक्षाही काही खास द्यायचय का? किंवा बहिणींना आपल्या भावाला काही खास गिफ्ट द्यायचे आहे का? मग यंदा तुमच्या मनातील भावना त्यांना बोलून दाखवा तेही शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून. आम्ही तुमच्या साठी काही खास rakshabandhan wishes , rakshabandhan quotes तसेच rakshabandhan messages मराठीमध्ये तयार केले आहेत, ते तुम्ही तुमच्या भावंडांना whatsapp, facebook, instagram वर पाठवू शकता.



Rakshabandhan wishes for sisters –
(बहिणींसाठी शुभेच्छा)-

rakshabandhan marathi wishes

ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
🌼🌼🌼
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌼🌼🌼
 जो पर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी तुझे रक्षण करतच राहणार. माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
🌼🌼🌼
 मी या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. रक्षाबंधनाच्या या शुभ दिवशी तू माझ्या हातात राखी बांधून माझ्या आरोग्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतेस. ताई तुझे खूप खूप आभार आपले नाते दिवसेंदिवस असेच मजबूत होत राहो.लव्ह यू ताई.
🌼🌼🌼
 या रक्षाबंधनाला मी तुला वचन देते की मी तुला त्रास देणे कधीच सोडणार नाही परंतु जेव्हा कठीण परिस्थिती मध्ये तुला माझी गरज भासेल तेव्हा मी तुझ्या पाठीशी नेहमी उभी राहीन.
🌼🌼🌼
कच्या धाग्यापासून बनवलेला एक मजबूत धागा म्हणजे राखी. राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड आठवणींचा क्षण. राखी म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना. बहिणीचा प्रेमाचा पवित्र सण म्हणजे राखी. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
🌼🌼🌼
 बहिण म्हणजे बालपणातील सर्व सुंदर आठवणींचे प्रतिबिंब असते. हॅप्पी रक्षाबंधन टू माय स्वीट सिस्टर.
🌼🌼🌼
 माझे आयुष्य तू खूप सुंदर बनवले आहेस मी तुला प्रत्येक वाईट संकटातून वाचवण्याचे वचन देतो आणि नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन. लव्ह यू सिस्टर.
🌼🌼🌼
 आपल्यामधील प्रेमाचे नाते कायमचे आहे. माझ्या प्रिय बहिणीप्रमाणे मला कोणीही समजून घेऊ शकत नाही. माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि बहीण झाल्याबद्दल धन्यवाद. आईप्रमाणे माझी काळजी घेतल्याबद्दल आणि माझ्या वर सर्वात जास्त प्रेम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌼🌼🌼
माझ्या परी सारख्या बहिनीला ईश्वर भरभरून आनंद, आरोग्य आणि संपत्ती देवो. हॅप्पी रक्षाबंधन माय स्वीट एंजल.
🌼🌼🌼
ताई तू काळजी करू नकोस या वर्षी आपण हा सण एकत्र साजरा करत नसलो म्हणून काय झाले तू बांधलेली गेल्यावर्षीची राखी अजूनही माझ्या हातातच आहे.
🌼🌼🌼
 ताई तू माझी किती काळजी करतेस, मी काहीही न बोलता तू माझ्या मनातले कसे ओळखतेस.ताई तुला मनापासून धन्यवाद.लव्ह यू ताई.
🌼🌼🌼
बहिण ही अशी व्यक्ती आहे जी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते आणि काळजी घेते. आपले विचार आणि भावना समजून घेऊन प्रत्येक कठीण परिस्थितीत मदत करते ती बहीण असते अशा माझ्या प्रिय बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
🌼🌼🌼
आपण या रक्षाबंधनाला एकत्र नाही पण म्हणून माझे तुझ्यावरील प्रेम बदलले नाही मी नेहमी तुझी काळजी घेईन आणि तुझे रक्षण करीन असे वचन देतो. हॅप्पी रक्षाबंधन सिस्टर.
🌼🌼🌼
तुझ्या मनगटावर राखी बांधण्यासाठी या वर्षी कदाचित मी तेथे नसेन परंतु मला माहित आहे मी नेहमी तुझ्या हृदयात आहे.
🌼🌼🌼
 ताई आत्तापर्यंत तू बांधलेली प्रत्येक राखी आणि त्यातील तुझे प्रेम मी आजही खूप जपून ठेवलेले आहे आणि नेहमीच माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन.खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
🌼🌼🌼
 बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी असूच शकत नाही आणि ताई तुझ्या पेक्षा चांगली बहीणया जगात नाही. माझ्या गोड ताईला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
🌼🌼🌼
तू नेहमीच माझ्याशी भांडण करतेस आणि म्हणतेस  की मी तुझ्यावर प्रेम करत नाही  तुला नेहमी त्रास देतो पण छोटी राखीच्या या शुभ प्रसंगी मला तुला एवढेच सांगायचे आहे की मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो. पण ऐक याचा अर्थ असा नाही कि मी तुला त्रास देणे थांबवेन. हॅप्पी राखी सिस्टर.
🌼🌼🌼
 ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांच्या कडे काळजी करणारी बहीण असते. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌼🌼🌼
 बहिणी आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि आपले अश्रू पुसण्यासाठी असतात. लव्ह यू माय स्वीट सिस्टर.
🌼🌼🌼
 डिअर सिस्टर, तू या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस मी खूपच भाग्यवान आहे कारण तू माझ्या सोबत आहेस तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
🌸🌸🌸



Raksha Bandhan wishes for brothers-
(भावांसाठी शुभेच्छा ) –

rakshabandhan marathi wishes


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌼🌼🌼
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
🌼🌼🌼

तुझ्या सारखा काळजी घेणारा आणि प्रेमळ भाऊ मिळाला याचा मला खूप अभिमान आहे नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल धन्यवाद.
🌼🌼🌼
 रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी ईश्वराकडे हीच प्रार्थना करते की माझ्या सुंदर भावाला दीर्घायुष्य, आनंदी, सकारात्मकता, शांती आणि सुस्वास्थ्य जीवन मिळो. माझ्या प्रेमळ भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌼🌼🌼
 दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस. तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस. लव्ह यू दादा. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
🌼🌼🌼
या संपूर्ण जगातील तू एकमेव व्यक्ती आहेस ज्याच्याशी मी माझ्या सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी शेअर करताना विचार करत नाही. मला देवाकडून एक उत्तम भाऊ भेट म्हणून मिळाला आहे जो माझ्या आयुष्यात भाऊ आणि मित्र या दोन भूमिका बजावतो तू सोबत असताना मला कधीच मित्राची गरज वाटली नाही.रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
🌼🌼🌼
तुझ्यासारखा प्रेमळ, दयाळू, काळजी घेणारा आणि गोड भाऊ मला मिळाल्याचा खूप आनंद आहे. तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहेस मी माझ्या भेटवस्तू ची वाट पाहत आहे आणि जर तू ती दिली नाहीस तर तुझ्यावर मोठे संकट येऊ शकते.
🌼🌼🌼
 माझे सर्व रहस्य लपवल्या बद्दल आणि मला जे हवे आहे ते करण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल धन्यवाद. लव्ह यू ब्रदर
🌼🌼🌼
ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.
🌼🌼🌼
आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
🌼🌼🌼
यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.
🌼🌼🌼
गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 
🌼🌼🌼
हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 
🌼🌼🌼
जर प्रेम चंद्रासारखे असेल तर भाऊ ताऱ्या प्रमाणे असतात आणि मी असे पाहिले आहे की चंद्रा शिवाय आकाश चांगले दिसते परंतु ताऱ्या शिवाय नाही. हॅप्पी रक्षाबंधन.
🌼🌼🌼
 डिअर ब्रदर, या रक्षाबंधनाला मला तुला सांगायचे आहे की तू एक उत्तम भाऊ आहेस आणि माझ्यासाठी तु माझे जग आहेस. हॅप्पी रक्षाबंधन ब्रदर.
🌼🌼🌼
दादा तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास, तुझ्या प्रेरणादायक शब्दांनी नेहमी मला प्रेरित केले आणि माझ्या अपयशावर विजय मिळवण्यास मला मदत केली दादा तू जे काही माझ्यासाठी केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌸🌸🌸


Rakshabandhan wishes for Whatsapp in Marathi –

rakshabandhan marathi wishes
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
🌼🌼🌼
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
🌼🌼🌼
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
🌼🌼🌼
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….
🌼🌼🌼
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…
🌼🌼🌼
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
🌼🌼🌼
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!
🌼🌼🌼
राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
🌼🌼🌼
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…
🌼🌼🌼
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌼🌼🌼
नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…
🌼🌼🌼
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…
🌼🌼🌼
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌼🌼🌼
चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌼🌼🌼
चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌼🌼🌼
रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते …
🌸🌸🌸



Raksha Bandhan wishes for Instagram in Marathi –

rakshabandhan marathi wishes


श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
🌼🌼🌼
ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो…
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!
🌼🌼🌼
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
🌼🌼🌼
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे…
🌼🌼🌼
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🌼🌼🌼
प्रत्येकाला एक बहिण असावी,
मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी,
पण एक बहिण असावी…
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी,
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी ,
मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी,
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी,
लहान असो वा मोठी,
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी,
लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी,
लहान असो वा मोठी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी”
म्हणून हाक मारणारी,
एक बहिण प्रत्येकाला असावी…
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी,
लहान असल्यास प्रत्येक पगारात
आपल्या खिशाला चंदन लावणारी,
ओवाळणी काय टाकायची हे
स्वतः ठरवत असली तरीही,
तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी,
स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी
प्रत्येकाला एक बहिण असावी……!
🌼🌼🌼
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!!
🌼🌼🌼
लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही. आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही.
🌸🌸🌸🌸🌸🌸
-:समाप्त:-


Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *