वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ६ ऋतू आहेत, त्यापैकी वर्षा म्हणजेच पावसाळा ऋतू हा मलाच काय तर खूप जणांना सर्वात प्रिय ऋतू आहे. उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हाच्या झळांना आराम द्यायला मराठी महिन्यांप्रमाणे श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक या महिन्यांमध्ये पावसाळा हा ऋतू भारतात येतो. इंग्रजी महिन्यांप्रमाणे जून से सप्टेंबर पर्यंत पावसाळा असतो.
पावसाळ्यातील पहिला पाऊस आला कि “ये रे ये रे पाऊसा” हि कविता चिमुकल्यांच्या तोंडावर असते.
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धाउन
मडके गेले वाहुन!
मग आकाशात काळे काळे, ढग जमू लागतात, सगळी कडे अंधार दाटून येतो, थंडगार वारा वाहू लागतो, विजांचा कडकडा होतो आणि मग पावसाला सुरवात होते. पावसाळ्यामधील पहिल्या पावसाचा आनंद प्रत्येकाला असतो, चिमण्या व पाखरांना उन्हापासून सुटका मिळून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते, लहान मुलं पहिल्या पावसात भिजून आनंद घेतात, वृद्ध माणसे पहिल्या पावसाचा सुगंध घेऊन आनंद घेतात. प्राणिमात्रांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते व त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब अंतरावर प्रवास करावा लागत नाही.
पाऊस पडल्याने सर्वी झाडे हिरवीगार होतात. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आटलेले नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात. बळीराजादेखील व शेतातील पेरलेले बियाणं उगवेलेल कल्पना करून खूप खुश होतो होतो. काहीच महिन्या मध्ये शेता मदे पिक डोलू लागते.
पावसात शाळेत जाण्याची मज्या काही वेगळीच असते, शाळेत जाण्यासाठी पप्पांनी घेऊन दिलेल्या रेनकोट घालून जायची मजाच काही वेगळी असते. मला पावसाने झालेल्या चिखलामध्ये फुटबॉल खेळायला खूप आवडते, आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो कागदाच्या होड्या बनून वाहत्या पाण्यात सोडतो पण केलेली मज्या घरी आल्यावर आईचा रागाने संपते, कपडे घाण झाल्याने आई खूप रागावते.
पावसाळ्यात धरणीमाता अगदी हिरवीगार साडी नेसलेली दिसते. वातावरण अगदी प्रसन्न बनते. पावसाळ्यात कुठे रिमझिम पाऊस, तर कुठे धो-धो पाऊस कोसळतो सर्व झाडे हिरवीगार होतात. या ऋतूमध्येच ज्यावेळी ऊन-पावसाचा खेळ चालतो, त्यावेळी इंद्रधनुष्य पहायला मिळतो. इंद्रधनुष्यही आपल्या सात रंगांची उधळन करून आकाश, वातावरण भारावून टाकतो.
राणा मध्ये, मोकळ्या पठारांवर, डोंगरांवर वेगवेगळ्या प्रकारची रंगीबिरंगी फुले फुलतात त्यांभोवती विविध रंगांची फुलपाखरं पाहून मनाला खूप आल्हाददायक वाटते. धबधबे, नदया, तलाव ओसंडून वाहायला लागतात, डोंगरावरून मोठे धबधबे वाहू लागतात त्यांना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. मी पाहिलेल्या धबधब्यांपैकी ठोसेघरचा धबधबा, भांबावली धबधबा मला खूप आवडतो, जे कि पावसाळ्यात पर्यटकांनी भरलेले असतात, त्यांना पाहण्याचा आनंद असा शब्दांमध्ये मांडणे अवघड आहे.
पाऊस पडत असताना सगळ्यांनाच गरम गरम भजी किंवा गरम आल्याचा चहा हा खूप आवडीचा असतो. माझ्या आईला ही पावसाळा खूप आवडतो.आई पावसाळ्या
पावसाळ्यातच अनेक सनांची रेलचेलही असते. बेंदूर, गणेशोत्सव, नागपंचमी, दहीहंडी, रक्षाबंधन श्रावणात अगदी हसरा, लाजरा श्रावणही पावसाता येतो. अगदी मोठमोठ्याला कवींनाही पावसावर कविता करण्याचा मोह आवरला नाही.