वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
|

40+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Marathi poems for birthday wishes

प्रत्येकाचा वाढदिवस त्याच्यासाठी खास असतो. त्या दिवशी जर आपण एखाद्या व्यक्तीला प्रेमाने शुभेच्छा दिल्या तर तो वर्षभर तरी त्या विसरत नाही.

तुम्हालाही जर तुमच्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही हि पोस्ट नक्की वाचा.

आम्ही ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी खालील विषयांवर कविता घेऊन आलेलो आहोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, Marathi poems for birthday wishes, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मित्रासाठी, Marathi Poems for birthday wishes to friend, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बायको साठी, Marathi Poems for birthday wishes to wife, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा, Marathi Poems for birthday wishes to father, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ, Marathi Poems for birthday wishes to brother, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बहिणीसाठी, Marathi Poems for birthday wishes to sister, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आईसाठी, Marathi Poems for birthday wishes to mother.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश Thank You For Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांची सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारखा लोकांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव स्मरणी राहो… आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या मनात सतत राहोत. तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…

तुझ्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवाळावा…
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

आपणास शिवनेरीची श्रीमंती

रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो

हीच शिवचरणी प्रार्थना…वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी…
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडावी…
आई जगदंबेची कृपा तुमच्यावर सदैव असावी…
वाढदिवसाच्याशिवमय शुभेच्छा…

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना..!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावानव्या सुखांनी, नव्या वैभवांनी वाढदिवस तुझा शतगुणित व्हावा…!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


Birthday poems for friends in Marathi

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा भावा !!

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमचे मनात घर करणारे..

त्यातलाच एक तू आहेस मित्रा , कायम आठवणीत राहणारा !

म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच…!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच…!!

मग कधी करायची पार्टी

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आपल्या भावाची किंमत नाही…

आणि किंमत करायची कोणाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला…

वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा…

हे पण वाचा :

५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मैत्रिणीसाठी

देवाचे आभार मान , ज्याने आपली भेट घडवून आणली…

मला एक चांगली आणि हुशार मैत्रीण

भेटली नाही म्हणून काय झाले?

तुला तर भेटली…! 😂😂😂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बायकोसाठी

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं…

वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल…

खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल…

Wish you Happy Birthday..!

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कठीण परिस्थितीतही सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, कधी भांडलो, आणि जरी झाले भरपूर वाद,
तरीही दुसऱ्याच क्षणी कानी येते तुझी प्रेमळ साद…
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती व्यक्ती आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, आणि माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा… Love You…💗💗

Birthday poems for Husband in Marathi

दिवस आहे आज खास
लाभो तुम्हास उदंड आयुष्य हाच मनी ध्यास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

कारभारी…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबांसाठी

जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,आपली सारी स्वप्न साकार व्हावी…
आजचा दिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक आनंदी व्हावे…

हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आईसाठी

सप्तरंगी इंद्रधनूची प्रतिमा तुमचे जीवन,

प्रत्येकाच्या रंगात रंगुनी जपता त्याचे मन…

असाच सदैव वसंत ऋतू फुलो तुझ्या जीवनी,

हीच शुभेच्या माझ्या ओठी तुमच्या वाढदिनी…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!

हे पण वाचा :

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ

आईच्या डोळ्यांतला तू तारा आहेस
सर्वांचा लाडका सितारा आहेस…
माझी सर्व काम करणारा बेचारा आहेस..

आणि आता एका वर्षाने मोठा म्हातारा आहेस…!

तरीही वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा…

हे पण वाचा :

मराठी बारा राशींची नावे व चिन्हे

Birthday poems for Sister in Marathi

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो हि निशा,

घेवोनी येवो नवी उमेद नवी आशा,

तुझ्या वाढदिवशी माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषी

हीच एक माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आईने जन्म दिला,
पण ताईने घास भरवला,
जरी सोबत नसली आई,
तरी तिच्या कर्तव्याचा, तू भार उचलला…
अशा माझ्या लाडक्या ताईस,
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मुलासाठी

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
यशस्वी हो, औक्षवंत हो । वाढदिवसाच्याअनंत शुभेच्छा!

Birthday poems for girls in Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या

रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आज्जीसाठी

अजुनही हवाहवासा वाटतो,
तुझा मायेचा स्पर्श!

आठवून लहानपणीचे किस्से, होतो अजूनही हर्ष…
अजुनही आठवतात,
तुझी चांदोमामांची गाणी..

आणि ती कापऱ्या आवाजातील तुझी मधुर वाणी..
अजुनही हवासा वाटतो,
तुझा आशीर्वाद…
तुझ्या दीर्घायुष्यासाठी घालतो परमेश्वराकडे साद…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज्जी…

हे पण वाचा :

सावित्रीबाई फुले निबंध । savitribai phule nibandh

Birthday poems for grandfather in Marathi

तुमच्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुमचे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो,

हीच तुमच्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा…

आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेतच,
पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात..
तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी
आजही मुख पाठ आहेत…
जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत..
तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे,
हेच ईश्वराकडे मागणे आहे..
तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा…
आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

जर तुम्हाला ह्या कविता आवडल्या असतील तर तुमच्या आवडत्या व्यक्तींना नकीच पाठवा…

आणि तुम्हाला पण कविता लिहण्याची आवड असेल तर तुमच्या कविता तुम्ही आम्हाला ‘[email protected]’ या इ-मेल वर पाठवू शकता.

Similar Posts

9 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *