majhi aaji nibandh in marathi
| |

{३ Essays} माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi

लहानपणी प्रत्येकाच्या कुटुंबात एकतरी व्यक्ती अशी असते जी आपला खूप लाड पुरवत असते. आमच्या कुटुंबातील ती व्यक्ती म्हणजे माझी आजी. तर मित्रांनी अश्या majhi aaji nibandh in marathi या खूप खास विषयवार मी तीन निबंध लिहले आहेत. तर ते तुम्ही खाली वाचू शकता.

तुम्ही हा निबंध खालील विषयांवर वापरू शकता :

  • माझी आजी मराठी निबंध
  • सोपा मराठी निबंध माझी आजी
  • Mazi Aaji Marathi Nibandh
  • majhi aaji nibandh in marathi
  • my grandmother essay in Marathi
  • maji aaji essay in Marathi
  • easy short essay on maji aaji

निबंध क्र. १

माझी आजी मराठी निबंध

   माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी, वडीलधारी व्यक्ती. तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. ती सकाळी आमच्या थोडी आधी उठते. अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते. आई तिला काम करू देत नाही. पण आजी ऐकतच नाही. आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते. न्याहारीसाठी ती कधीतरी एखादा पदार्थ करते. तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खुश होते. दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी. व्ही. पाहते. कधी कधी टी. व्ही. पाहता पाहता तेथेच झोपते. संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते. ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही.


            माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते. ती कधीही रागावत नाही. मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही. एकदाही रागावली नाही. उलट, आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते. माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाबा अभ्यासासाठी खूप मागे लागले, तरी आजीला आवडत नाही. त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो. तिला वाईट वाटणार नाही, याची काळजी घेतो. आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले, तर किती छान होईल !


            आजीला वाचनाचा छंद आहे; पण हल्ली तिचे डोळे दुखतात. मग ती मलाच वाचायला सांगते आणि ती ऐकते. तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात. माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते. दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो. मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते. मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो. अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की, आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो.


            एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो. काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, असे ती सांगते. बाबांनासुद्धा ती तसेच सांगते. आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात. माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते. ती काहीतरी खाऊ करून त्यांना देतेच.
            ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही. कधीतरी ती मला आपले पाय चेपायला सांगते, तेवढेच. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.

हे पण वाचा :

माझी आई मराठी निबंध


निबंध क्र. २

majhi aaji nibandh in marathi

            बाबांना ‘पारखे पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी सासवन्याहून आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, “अरे नंदू माझी खूप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ला, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला.” आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.
            आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही ना तिच्या काम करण्याच्या वेगात फरक पडलाय, आई मला नेहमी टोम्बने मारते कि “आजी कडे बघ पंच्याहत्तर ओलांडली तरी किती काटक आहे, आणि तु एवढ्या लहान वयात आळशीपणा करतोस कसं होयच तुझं देव जाणे”. ख सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्ह वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंत गेली.
            माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी व कष्टाळू होते. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही एका शिक्षण संस्थेत काम करत राहिले तिथं त्यांनी मनापासून काम केलं, मुल्लांना खूप चांगलं शिकवलं नाव कमावलं. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते आमच्या गावात काम कर राहिले. सगळा ‘निष्काम कर्मयोग’ ! काम करणान्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच!
            आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत, पण एक आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. लोकांच्या कामाला येऊन ती आमच्या गावाची ‘मोठी आई’ बनली आहे, तीच गावामध्ये खूप नाव झालं आहे.
            आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःचे सर्व आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी कधी भाताची पेज, पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. ती एकभुक्त आहे. म्हणजे दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे आणि कष्ट करण्याची जिद्द हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते.
            आजी स्वत:साठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.

हे पण वाचा :

सावित्रीबाई फुले निबंध

५८+ सोपे मराठी निबंध

लहान मुलांची नावे व अर्थ


निबंध क्र. ३

Mazi Aaji Marathi Nibandh

‘माझ्या आजी लागी वेड, जुने-पाने जपायच पैठणीच्या पदराला कुंचीसाठी राखायचे’
            आमची आजी जेव्हा आमच्या घरी राहायला येते तेव्हा आमच्या घरातील सारे वातावरण उल्हासाने फुलून येते. माझ्या आजीचे नाव आनंदी आहे. तिचे नाव तिच्या स्वभावाला साजेसे आहे. तिचा चेहरा नेहमी आनंदी असतो. ती हा आनंदच सर्वांना वाटत असते. हेच तिच्या आरोग्याचे खरे गमक आहे.
            मी लहान असताना माझ्या आजीचे मला अनेक प्रसंग आठवतात. आम्ही सर्व भावंडे दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे राहायला जायचो. आम्ही आल्याने तिला खूप आनंद व्हायचा. ती आमच्यासाठी कैरीचे लिंबाचे मिरचीचे फणसाचे असे अनेक प्रकारचे लोणचे तयार करून ठेवायची. ती आम्हाला रोज सकाळी उठवायची तिने घरापुढे छोटीशी फुलांची बाग तयार केली होती त्यातून आम्हाला की फुले आणायला लावायची व आम्ही ती देवाला व्हायचो. आम्ही सर्वांनी देवपूजा केली की मग आम्ही खेळायला जायचो. आजी आम्हाला शेताकडे घेऊन जायची व पिकलेले आंबे जांभूळ करवंद अशी अनेक फळे खाऊ घालायची. कधीकधी आम्ही ती झाडावरून चढून काढायचो. दररोज संध्याकाळी ती आम्हाला हात पाय धुऊन देवापुढे दिवा लावायला सांगायची. 
शुभं करोति कल्याणम आरोग्यम् धनसंपदा |
शत्रूबुद्धी विनाशाय दीपज्योतीनमोऽस्तुते ||
            हा श्लोक म्हणून आमची सायंकाळची देवपूजा व्हायची. रात्रीच जेवण झाल्यानंतर रात्री झोपताना आम्हाला ती छान छान गोष्टी सांगायची.कधी रामाची, कधी कृष्णाची, तर कधी जादूई दुनियेतील परीची, कधी कावळ्याची , कधी लबाड लांडग्याची अशा अनेक गोष्टी तिला माहीत होत्या त्या मला आजही आठवतात.
            माझी आजी स्वयंपाकात सुगरण होती. म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणत. गावातील कुणाकडेही कार्यक्रम असले की स्वादिष्ट जेवण बनविण्यासाठी आजीचा हातभार लागे. माझ्या आजीला निरनिराळ्या व्याधींवरील औषधे माहित होती. त्यामुळे दूरदूरहून रुग्ण तिच्याकडून औषध न्यायला येत व आजीला स्वखुशीने औषधांसाठी काही पैसे देत.
            आजीचे आपल्या घराप्रमाणे गावावरही खूप प्रेम होते. त्यामुळे गावातील सर्वांच्या अडीअडचणीला आजी नेहमी धावून जाई. लोणची, मसाले बनविण्यात तरी आजीचा हातखंडा होता. सुरुवातीला तिने गावातील गरजू आणि कष्टाळू बायकांना जमवून लोणची, मसाले, पापड बनविण्याचा गृहोद्योग सुरु केला. त्यांत तिला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर तिने शिवण, वीणकामाची आवड असणाऱ्या स्त्रियांना एकत्र करुन त्यांच्यासाठी शिवण वर्ग सुरु केले. त्यामुळे अनेक स्त्रियांना रोजगार प्राप्त झाला. त्यामुळे आजही अनेक स्रियां काहीही शिकायला आजीकडे येतात.
            गावातील महिलांना रोजगार प्राप्त झाल्यावर त्यांच्या लहान मुलांच्या सांभाळण्याचा प्रश्नही आजीनेच सोडवला. आमच्या आजोबांच्या प्रशस्त वाड्यातील एका खोलीत तिने लहानमुलांचे संस्कारवर्ग आणि पाळणाघर चालू केले. पाळणाघरातील मदतीसाठी दोन महिलांना ठेऊन तिने मुलांच्या आय्यांना आपल्या कामासाठी मोकळीक दिली.
            आम्ही जेव्हा आजीकडे जातो तेव्हा तिचा दैनंदिन कार्यक्रम पाहून आश्चर्य वाटते. दिवसाच्या चोवीस तासांपैकी सोळा तास ती अविरत काम करत असते. त्यातुनच फावल्या वेळेत पोथ्या पुराणवाचन चालूच असते. माझी आजी जुनी सातवी पास आहे. जास्त शिकलेली नाही पण बहुश्रुत आहे. रात्री देवळात चालणाऱ्या हरिनाम सप्ताहाला ती पहिली हजेरी लावते. देवळातील भजन तिच्या गोड आवाजाने रंगत आणते. भजनात मध्यरात्र उलटून केव्हा जाते हे ही तिला समजत नाही.
            माझ्या आजीची राहणी खूप साधी आहे. लोकांना खायला करुन द्यायची तिला फार आवड आहे. आज माझी आजी ७६ वर्षाची आहे. तिच्या आहाराविहारात तिच्या कार्यक्षमतेचे रहस्य दडलेले आहे. रोज पहाटे उठून ती योगासने करते. आजही तिच्या चालण्याचा वेग झपाटल्याप्रमाणे असतो.
            माझ्या आजीच्या दंतपक्ती आजही शाबूत आहेत. त्याचे सारे श्रेय ती ऊस, चणे, फुटाणे या सारख्या खाद्यपदार्थांना देते. अशी सर्वगुणसंपन्न आजी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही परमेश्वराचे ऋणी आहोत. यावर्षी आम्ही सर्व नातवंड तिचा ७६ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार आहोत.

तर मित्रांनो तुम्हाला majhi aaji nibandh in marathi हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *