{2024} जाणून घ्या मराठी अंक इतिहास । अंकचिन्ह । दशमान पद्धति । संख्या प्रणाली । संख्या वाचन
Table of Contents
(अंकचिन्ह) संख्यांचा इतिहास:
सध्या जगभरात प्रचलित असलेले संख्या चिन्ह 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पूर्वी जगभरात वापरात न्हवते, समान्यपणे त्यांच्या जागेवर विविध चिन्हांचा वापर केला जायचा जे वापरण्यात बऱ्याच अडचणी यायच्या.
१४ व्या शतकानंतर हिंदू–अरबी अंक प्रणाली पूर्ण जगभरात पसरली आणि ती आजही संपूर्ण जगात वापरात आहे.
ही प्रणाली उत्कृष्ट ठरली याचे सर्वात मोठे श्रेय जाते शुन्याला (०) जे की भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त ज्यांनी सर्वप्रथम शुन्याला जगापुढ आणले होते.
या संख्या १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ० अशा होत्या ज्यांच्या एकत्रित वापरने मोठ्या आकडेवारी देखील मांडने सोपे झाले.
अंकचिन्ह:
देवनागरी अंकचिन्हे-
१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०.
हिंदू–अरबी अंकचिन्हे-
0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 यांना ‘डिट्स’ देखील म्हणतात.
संख्या प्रणाली
सर्व अंकांचा (0 ते 9) एकत्र वापर करुण जे लेखन केले जाते त्याला दशमान संख्या प्रणाली म्हणतात जी की सर्वसामान्यपने जगात सर्वत्र व्यवहारासाठी वापरली जाते.
द्विमान सांख्यप्रणालीमध्ये फक्त 0 व 1 ही दोनच अंक चिन्ह वापरली जातात, त्यांना बीट्स( binary digits) असे इंग्रजी मधे सम्बोधतात.
संख्या प्रणाली व अंक चिन्ह
संख्या प्रणाली | अंक चिन्ह |
---|---|
द्विमान | 0 आणि 1 |
त्रिमान | 0, 1 आणि 2 |
चर्तुमान | 0, 1, 2, आणि 3 |
पंचमान | 0, 1, 2, 3, आणि 4 |
अष्टचिन्ह पद्धत | 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 |
दशमान पद्धत | 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 |
षोडश चिन्ह पद्धत | 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,A, B, C, D, E आणि F |
मराठी (देवनागरी) दशमान पद्धतिनुसार १० च्या पटीतील आकडे व संबंधित शाब्दिक आकडे.
आकडे | शाब्दिक आकडे |
---|---|
१ | एक |
१० | दहा |
१००० | एक हजार |
१०,००० | दहा हजार |
१०,००,०० | एक लाख |
१०,००,००० | दहा लाख |
१०,०००,००० | एक कोटी |
१००,०००,००० | दहा कोटी |
१,०००,०००,००० | एक अब्ज |
१०,०००,०००,००० | खर्व किंवा दश अब्ज |
१००,०००,०००,००० | निखर्व |
१,०००,०००,०००,००० | पद्म |
१०,०००,०००,०००,००० | शंकु किंवा नील |
१००,०००,०००,०००,००० | जलधी किंवा दशनील |
१,०००,०००,०००,०००,००० | अंत्य |
१०,०००,०००,०००,०००,००० | मध्य |
इंग्लिश प्रणालीत १० च्या पटीतील संख्यांना थाऊजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत, तसेच मराठी मध्ये देखील या प्रणाली आहेत:
एकक,
दशक,
शतक,
हजार,
दशहजार,
लक्ष,
दशलक्ष,
कोटी,
दशकोटी,
अब्ज,
दश अब्ज.
१० वर २१ शून्य म्हणजे उत्संग
१० वर ३१ शुन्य म्हणजे हेतुहीलम
१० वर ४१ शुन्य म्हणजे नित्रवाद्यम
१० वर ९५ शुन्य म्हणजे अनंत
१० वर ९६ शुन्य म्हणजे दश अनंत
असे ९६व्या शुण्यापर्यंत दशगुणोत्तरी संज्ञा भारतीय ग्रंथांमध्ये आहेत.
संख्या वाचन
दशमान संख्या पद्धती मध्ये संख्या वाचनाला अंकांच्या स्थानाला किम्मत असते.
कोणत्याही एका संख्येला दोन प्रकारच्या कीमती असतात दर्शनी किम्मत व स्थानिक किम्मत.
उदाहरणार्थ ५४३२१
वरील उदाहरणार्थमध्ये ५, ४, ३, २ आणि १ दर्शनी किंमतीचे अंक आहेत.
तर ५००००, ४०००, ३००, २० आणि १ स्थानिक किंमत अनुक्रमे आहेत या स्थानिक क़ीमतींची बेरीज नेहमी मूळ संख्येएवढी असते.
संख्या वाचन डावीकडून उजवीकडून केले जाते. ५४३२१ या संख्येचे वाचन “चौपन्न हजार तीनशे एकवीस” असे केले जाते.
अंकांची स्थानिक किम्मत उजवीकडून डावीकडे वाढत जाते हे देखील सर्वप्रथम भारतीय गणितज्ञांनीच शोधून काढले होते.
संख्या वाचनासाठी जे उपसर्ग उपयोगात आणले जातात. त्यांना दशगुणोत्तरी संज्ञा असे म्हणतात.
१० एकक म्हणजे एक दशक
१० दशक म्हणजे एक शतक
१० शतक म्हणजे एक हजार
१० हजार म्हणजे दहा हजार
१० दहा हजार म्हणजे एक लक्ष
१० लक्ष म्हणजे दस लक्ष
१० दस लक्ष म्हणजे एक कोटी
१० कोटी म्हणजे दस कोटी
हे नक्की वाचा :
- १ ते १०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 1 to 100 Numbers in Marathi With English Pronunciation
- १०१ ते २०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 101 to 200 Numbers in Marathi With English Pronunciation
- २०१ ते ३०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 201 to 300 Numbers in Marathi With English Pronunciation
- ३०१ ते ४०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 301 to 400 Numbers in Marathi With English Pronunciation
- ४०१ ते ५०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 401 to 500 Numbers in Marathi With English Pronunciation
- ५०१ ते ६०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 501 to 600 Numbers in Marathi With English Pronunciation
- ६०१ ते ७०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 601 to 700 Numbers in Marathi With English Pronunciation
- ७०१ ते ८०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 701 to 800 Numbers in Marathi With English Pronunciation
- ८०१ ते ९०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 801 to 900 Numbers in Marathi With English Pronunciation
- ९०१ ते १००० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 901 to 1000 Numbers in Marathi With English Pronunciation