APJ Abdul Kalam Information In Marathi

एपीजे अब्दुल कलाम यांची माहिती | APJ Abdul Kalam Information In Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण डॉ. अब्दुल कलाम यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखतात. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान देऊन भारतीय लोकांची वेगळी ओळख जगामध्ये दाखवून दिलेली आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. अब्दुल कलाम हे खूप कर्तुत्ववान व्यक्ती आहे. आजच्या या लेखामध्ये आपण कलामांचे शिक्षण, त्यांना मिळालेले पुरस्कार ,त्यांचा जीवन परिचय ,व त्यांचे बुक्स अशी अनेक इत्यादी माहिती बघणार आहोत.

अब्दुल कलाम यांचे सुरुवातीचे आयुष्य (APJ Abdul Kalam starting life):

अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तमिळनाडू मधील रामेश्वरम येथे तमिळ मुस्लिम कुटुंबामध्ये झाला. अब्दुल कलाम यांचे वडील निरक्षर होते, त्यांचे नाव जैनलब्दिन होते. वडील खूप सामान्य व्यक्ती होते पण त्यांचे विचार खूप वरचे होते. ते नेहमी उच्च विचार करत असत. त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या आईचे नाव असिमा होते. ती घर गृहिणी होती. कलाम हे एकूण पाच भावंड होती त्यांना तीन मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण होती. कलाम यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती. ते नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी तयार होत असत. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या तरुण वयातच वर्तमानपत्र विकायला सुरुवात केली. कारण त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज होती. अब्दुल कलाम यांचा गणित हा खूप आवडतीचा विषय होता.

अब्दुल कलाम यांचे शिक्षण (Education of Abdul Kalam):

अब्दुल कलाम यांचे शिक्षण रामेश्वरम येथे प्राथमिक शाळेत झाले. व नंतरचे शिक्षण रामनाथ पुरम येथे चार्ट हायस्कूल मधून झाले. अब्दुल कलाम यांनी इंटरमीडिएट शिक्षण घेण्यासाठी 1950 मध्ये तिरुचिरापल्ली सेंड जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. व तेथे त्यांनी भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करून बी.एस.सी साठी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी इंजीनियरिंग मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन व पहिले वर्ष पूर्ण करून तसेच मतदानाविषयी अभ्यास देखील पूर्ण केला . नंतर त्यांनी एरोनॉटिकल इंजीनियरिंग ला आपला विशेष विषय घेऊन पदवी घेतली. त्यांनी अमेरिकेतील नासा या संशोधन संस्थेत टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीची सुरुवात(APJ Abdul Kalam career):

अब्दुल कलाम डीटीडी मनी ती टेक्निकल सेंटर मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागले. प्रोटोटाईप हॉवर क्राफ्टसाठी तयार केलेल्या वैज्ञानिक टीमचे नेतृत्व पार पाडले. कलाम यांनी भारतीय लष्करासाठी एक हेलिकॉप्टर डिझाईन केले होते. 1962 मध्ये अब्दुल कलाम यांनी संरक्षण संशोधन सोडून अंतराळ संशोधनात काम करायला सुरुवात केली. त्यांच्या संशोधनाच्या काळात त्यांनी अनेक पदे भूषवली. 1969 मध्ये अब्दुल कलाम भारताच्या पहिल्या SLV-3 (रोहिणी) च्या वेळी इसरो(ISRO) मध्ये प्रकल्प प्रमुख झाले. कलामांच्या नेतृत्वाखाली १९८० मध्ये रोहिणीची यशस्वी स्थापना झाली. त्यांच्या या कामामुळे भारत सरकारने त्यांना भारताच्या राष्ट्रीय पुरस्कारापैकी एक पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. अब्दुल कलाम हे आपल्या यशाचे श्रेय नेहमी त्यांच्या आईला देत असत. त्यांनी असे सांगितले की त्यांच्या आईने त्यांना चांगले वाईट समजून घ्यायला शिकवले.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपती होण्याचा प्रवास (life of APJ Abdul Kalam’s presidency ):

सन 1982 मध्ये ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक बनले. आकाश अग्नी आणि पृथ्वी यांच्या प्रक्षेपणात अब्दुल कलाम यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 1992 मध्ये एपीजे अब्दुल कलाम हे संरक्षण मंत्र्याचे विज्ञान सल्लागार सचिव बनले. 1999 पर्यंत ते या पदावर काम करत राहिले. भारत सरकारच्या मुख्य शास्त्रज्ञांच्या यादीत अब्दुल कलाम यांचे नाव समाविष्ट आहे. एपीजे अब्दुल कलाम यांना विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सर्वात मोठा पुरस्कार “भारतरत्न” प्रदान करण्यात आला. भारतीय जनता पार्टी समर्थित NDA यांनी कलाम यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार बनवले. 18 जुलै 2002 रोजी एपीजे अब्दुल कलाम यांनी शपथ घेतली. अब्दुल कलाम यांचा राजकारणाशी अजिबात संबंध नव्हता तरीही ते सर्वोच्च राष्ट्रपती पदावर राहिले. भारतातील अनेक तरुण लोकांचे एपीजे अब्दुल कलाम हे आदर्श आहेत.

डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे राष्ट्रपती पद (Presidency of Dr. APJ Abdul Kalam):

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून 2002 ते 2007 या काळामध्ये काम केले. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे भारताचे राष्ट्रपती पद असतानी त्यांनी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी खास करून नाविन्य आणि संशोधनाच्या क्षेत्रावर भर दिली तसेच भारताच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षमतांच्या विकासासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी देशभर प्रवास करून विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी विशेषतः ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला आणि तेथील युवकांना तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन दिले. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या संपूर्ण राष्ट्रपतीपदाच्या काळामध्ये भारताला एक स्वावलंबी राष्ट्र बनविण्याच्या दिशेने त्यांचे मोलाचे योगदान दिले. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना आपण आज त्यांच्या नम्रता, साधेपणा तसेच त्यांची राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित वृत्ती यासाठी ओळखतो. त्यांनी त्यांच्या राष्ट्रपतीपदावर असलेल्या काळामध्ये देशाच्या प्रगतीसाठी दिलेले समर्पण आजही भारतातील युवकांना प्रेरणा देत आहे आणि सर्व भारतीयांची एक प्रिय व्यक्ती म्हणून त्यांना ओळख मिळाली आहे.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके (books written by Dr. APJ Abdul Kalam):

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे. त्यांनी त्यांच्या जीवन काळामध्ये अनेक पुस्तके लिहिली. त्यामधूनच एक उल्लेखनीय पुस्तक म्हणजे “विंग्स ऑफ फायर” हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल तसेच त्यांन्नी एक शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या प्रवासाबद्दल आणि भारताच्या विकासासाठीची त्यांची दृष्टी यांची माहिती दिलेली आहे. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले काही पुस्तके खालील प्रमाणे:

1. विंग्स ऑफ फायर (Wings of fire)

2. Ignited mines.

3. India 2020.

4. My journey transforming dreams into actions.

5. The luminous sparks.

6. Guiding souls : Dialogues on the purpose of life.

7. Transcendence : My spiritual experience with promo Swamiji.

8. Invisioning empowered nation.

9. The guiding light: leadership lessons from Abdul Kalam.

10. You are born to blossom : Take my journey beyond.

11. Indomitable spirit.

12. The scientific Indian : A 21st century guide to the world around us.

13. Reignited: Scientific pathways to a brighter future.

    त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधील ही काही उत्कृष्ट पुस्तके आहेत.

एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन(APJ Abdul Kalam’s death):

अब्दुल कलाम हे 27 जुलै 2015 शिलॉंग ला एका कार्यक्रमासाठी गेलेले होते. तिथे एका कॉलेजमध्ये मुलांना लेक्चर देत असताना ते अचानक कोसळले. नंतर त्यांना शिलॉंगच्या एका रुग्णालयामध्ये दाखल केली. त्यांची अवस्था खूप गंभीर असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि सर्वांचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या वयाच्या 84 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर 28 जुलै रोजी त्यांना दिल्लीला आणण्यात आले. तिथे सर्व नेत्यांनी येऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांना त्यांच्या गावी नेऊन 30 जुलै 2015 रोजी रामेश्वरम जवळ त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले. कलाम यांना मिसाईल मॅन असे म्हणतात त्यांनी पूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली. व त्यांच्या ज्ञानातून अनेकांना घडवले. भारत सुरक्षित व्हावा यासाठी त्यांनी नवनवीन उपकरणे तयार केली. देशाचे यशस्वी राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलामांकडे बघितले जाते. त्यांनी वेळोवेळी देशातील तरुणांना मार्गदर्शन केले व ते त्यांच्या घोषणा आणि पुस्तकांच्या माध्यमातून सर्वांनाच मार्गदर्शन करतात.

निष्कर्ष (Conclusion):

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण APJ Abdul Kalam information in Marathi यावर माहिती बघितली. अब्दुल कलाम यांचे सुरुवातीचे आयुष्य , त्यांनी लिहिलेली पुस्तके,त्यांचं बालपण ,जन्म, त्यांचं शिक्षण व राष्ट्रपती होण्याचा प्रवास आणि त्यांच्या करिअरची सुरुवात अश्या अनेक topics वर आपण चर्चा केली. तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या तरुण मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. कारण अब्दुल कलाम हे त्यांच्या पुस्तकातून व घोषणांमधून तरुणांना खूप मोलाचे मार्गदर्शन करतात. आणि हा लेख आजच्या पिढीने वाचलाच पाहिजे. धन्यवाद!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *