[2024] सोनेतारण कर्ज मराठी माहिती | Gold loan information in Marathi
Gold loan information in Marathi: नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर व मनोरंजनाच्या या प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. रोजच्या दैनंदिन आयुष्य जगताना आपल्याला काही वेळा अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
आपण आपल्या उत्पन्नातून अशा अडचणींसाठी बचत व गुंतवणूक करतच असतो. परंतु कधी कधी ही बचत सुद्धा आपुरी पडते. जसे की, आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, घर बांधायचे आहे ,घराचे नूतनीकरण करायचे आहे ,कधी कधी अचानक आलेले आजारपण, मुलांच्या शाळा व कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी अपुरी रक्कम, तसेच काहींना आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याची तरतूद करणे. अशा अनेक समस्या उद्भवत असतात.
मग अशा अचानक येणाऱ्या खर्चासाठी आपण काय कराल? कारण अशा समस्या उद्भवल्या तर थोड्या पैशासाठी आपण आपले स्वप्न पूर्ण करायची नाही का? आपले स्वप्नातले घर आपण असेच सोडून द्यायचे का ?आपण आपल्या मुलांसाठी पाहिलेले स्वप्न, त्यांचा आवडता कोर्स व आवडत्या कॉलेजला प्रवेश न मिळणे. हे आपल्याला कधीच मान्य होणार नाही.
त्यासाठी आपण काय उपाय करायचा? असे अनेक प्रश्न आपल्याला नक्कीच पडले असतील. तर, त्याचीच उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. अशा वेळेस तुमच्या मनात नक्कीच विचारेल की, आपण कर्ज काढावे कारण सर्वसामान्य माणूस असो किंवा कोणी असो त्याला कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
कारण आपण एवढे पैसे कोणाकडेही उधार मागू शकत नाही व कोणी आपल्याला एवढी मोठी रक्कम उधारही देत नाही. पाहिले तर नोकरदार वर्गाला त्याच्या पगारावर वैयक्तिक कर्ज हे लगेच उपलब्ध होत असते.
परंतु सर्वसामान्यांना वैयक्तिक कर्ज असो किंवा दुसरे एखादे कर्ज घ्यायचे म्हटले की ,खूप अडचणींना सामोरे जावे लागते. खूप कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. यावर उपाय काय? ते म्हणजे “गोल्डलोन” म्हणजेच “सोनेतारण कर्ज” आपल्याला तर माहीतच आहे की, पूर्वीपासून भारतीयांना सोन्या विषयी खूप आत्मीयता आहे. त्यांचे सुवर्ण प्रेम हे जगजाहीर आहे.
सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक म्हणून भारत या देशाकडे पाहिले जाते. आपल्या भारतात सोने खरेदी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सोन्याचा भाव हा आभाळाला टेकलेला असूनही लोकं त्याची खरेदी करण्याला पसंती देत आहेत. आज पाहिले तर सामान्य माणसाकडे सुद्धा थोडेफार तोळे सोने असते.
आज-काल सोने खरेदी करणे म्हणजे ही एक हौस न राहता त्याच्याकडे एक प्रकारची इन्वेस्टमेंट म्हणूनही पाहिले जात आहे. पूर्वीपासून मुलीच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा स्त्रीधन म्हणून मुलीला सोने दिले जाते. कारण अडीअडचणीत हे सोने तिला कामाला येईल. विशेष करून स्त्रियांना सोन्याबद्दलचे आकर्षण हे पूर्वीपासूनच आपणास पाहण्यास मिळत आहे.
पूर्वीच्या काळी बँका अस्तित्वात नव्हत्या. तेव्हा लोक अडचण आली की, सावकाराकडे आपले सोने गहाण ठेवत असे. म्हणजे अडचणीच्या वेळेस सोने गहाण ठेवणे ही पूर्वीपासूनच प्रचलित प्रथा आहे. पण आता त्या सावकारीची जागा बँकांनी घेतली आहे .
आजच्या लेखात मी तुम्हाला सोनेतारण कर्ज म्हणजे काय? सोनेतारण कर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते? सोनेतारण कर्जाचा व्याजदर किती आहे? सोनेतारण कर्ज कालावधी किती असतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या लेखात देणार आहे. चला, तर मग या ज्ञानसागर प्रवासाची सुरुवात करूयात!!!
Table of Contents
सोनेतारण कर्ज म्हणजे काय? What is Gold loan?
सोनेतारण कर्ज म्हणजे आपल्याकडे असलेले सोने आपण बँकेकडे गहाण ठेवतो म्हणजेच तारण ठेवतो व त्या बदल्यात बँक आपल्याला कर्जाच्या स्वरूपात विशेष अशी रक्कम देत असते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आपल्याला काही आर्थिक अडचण आली तर आपण आपले सोने न मोडता बँकेकडे ते सोने गहाण ठेवून त्यावर कर्ज काढू शकतो. ज्याप्रमाणे गृह कर्ज व वैयक्तिक कर्ज असते त्याचप्रमाणे सोने तारण कर्ज हे असते.
सोनी तारण कर्ज घेण्यासाठी लागणारी पात्रता
सोनेतारण कर्ज हे कोणीही घेऊ शकतो.मग तो शेतकरी असो, पगारदार असो,व्यावसायिक असो, स्वयंरोजगार असो,गृहिणी असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असो. सोनेतारण कर्ज हे कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतो. फक्त त्याचे वय 21 ते 70 वर्ष असे असावे.
सोने तारण कर्जाचे फायदे
सर्वसामान्य व्यक्तींना परवडण्यासारखे हे एक कर्ज असते. जसे की, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कर्ज काढण्यासाठी व्यक्तींना भरपूर अशा कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. तसे सोनेतारण कर्जाचे नसते .सोनेतारण कर्ज घेण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची जमवाजमव करावी लागत नाही.
फक्त आपल्याकडे सोने असणे गरजेचे आहे. सोनेतारण करण्यासाठी फक्त आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोनच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सोनेतारण कर्ज हे आपल्याला एका दिवसातच उपलब्ध होत असते. सोनेतारण कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जाच्या व्याजदरापेक्षा कमी असते.
सोनेतारण कर्ज घेताना इतर कर्जाप्रमाणे आपला सिबिल स्कोर बघितला जात नाही. गृह कर्ज असो किंवा पर्सनल लोन असो हे घेताना आपल्याला आपला पगार दाखवावा लागतो. तसेच सोनेतारण कर्ज घेताना आपल्याकडे फक्त सोने असावे लागते. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे असे हे कर्ज आहे. त्यामुळे गोल्डलोन याला एक विश्वसनीय उपाय समजला जातो.
तसेच सोनेतारण कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे असेही म्हणतात.
सोनेतारण कर्जाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सोनेतारण कर्जाचा कालावधी हा एक वर्षाचा असतो. आपण जर एक वर्षात हे कर्ज फेडू शकलो नाही तर आपण हे सोने तारण कर्ज परत नूतनीकरण करू शकतो.
सोनेतारण कर्जाची रक्कम ही एकाच दिवसात आपल्या खात्यावर जमा केली जाते म्हणजेच हे जलदगतीने प्राप्त होणारे कर्ज आहे.
तसेच सोनेतारण कर्ज करताना वारसाची नोंदही ठेवली जाते. जर कर्जदाराला सोनेतारण कर्ज घेतल्यानंतर अकस्मात मृत्यू आला तर अशा वेळेस त्याचे कर्ज वसूल करून त्याच्या वारसाला हे सोने दिले जाते.
सोने तारण कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- रहिवासी चा पुरावा म्हणून आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन
- ज्या बँकेत आपण सोनेतारण कर्ज घेणार आहे त्या बँकेत बचत खाते कारण, सोनेतारण कर्जाची रक्कम आपल्या खात्यावर जमा केली जाते.
सोनेतारण कर्जाची प्रक्रिया
आपण सोनेतारण कर्ज करण्यासाठी ज्या बँकेत जातो. तेव्हा सर्वात प्रथम तुमच्या सोन्याची शुद्धता ही तपासली जाते. म्हणजेच तुमचे सोने खरे आहे की खोटे याची शहानिशा करण्यात येते. त्यासाठी बँकेने व्हॅल्यूअर असलेला सराफ नियुक्त केलेला असतो. त्या सराफाकडून आपल्या सोन्याचे वजन केले जाते.
तो सराफ आपल्या दागिन्यांची काळजीपूर्वक चाचणी करून ते सोने किती शुद्ध आहे हे सांगतो. दागिन्याच्या वजनातून लाख ,काळे मणी, खडे वगैरे वजा करून सोन्याचे वजन काढले जाते. त्यालाच आपण नेटवेट असे म्हणतो. उदाहरणार्थ 10 ग्रॅम मागे 2 ग्रॅम हे वजनातून कमी केले जाते म्हणजेच दहा ग्रॅम वर दोन ग्रॅम घट धरली जाते.
याच वजनावर आपल्याला सोनेतारण कर्ज दिले जाते. प्रत्येक बँकेचा सोनेतारण दर हा वेगळा असतो. उदाहरणार्थ एखादी बँक 10 ग्रॅमला 32000 मंजूर करते तर काही बँका 10 ग्रॅमला 35000 असे मंजूर करत असते. म्हणजेच प्रति दहा ग्रॅम ला 32000 व 35000 असे कर्ज मंजूर होत असते.
सोनेतारण कर्जाची प्रक्रिया पार पाडताना आपल्याला सराफाचे मानधन ज्याला आपण सराफ कमिशन असे म्हणतो. ते सर्वसाधारणपणे पाचशे रुपयांपर्यंत असते. तसेच बँकेची प्रोसेसिंग फी, फॉर्म फी अशा प्रकारचा खर्च आकारला जातो. हा जो खर्च असतो हा प्रत्येक बँकेचा वेगवेगळा असू शकतो.
प्रत्येक बँकेत यामध्ये तफावत असू शकते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या बँकेत असलेल्या आपल्या खात्यावर सोनेतारण कर्जाची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी त्या बँकेत आपले बचत खाते असणे गरजेचे आहे. म्हणजेच ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर एका दिवसातच आपल्या सोनेतारण कर्जाची रक्कम आपल्याला मिळते.
सोनेतारण कर्ज व्याजदर
वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरापेक्षा सोनेतारण कर्ज व्याजदर हे कमी असते.
निरनिराळ्या बँकांचे सोनेतारण कर्ज व्याजदर हे निरनिराळे असू शकते. प्रत्येक बँकेच्या व्याजदरात तफावत आपणास आढळून येते. काही बँकांमध्ये हा व्याजदर हा 9% असतो. तर काही बँकांमध्ये 8% असतो .तर काही बँकांमध्ये तो 7% ही असतो. काळानुसार हा व्याजदर बदलत असतो.
सोने तारण कर्जाचा कालावधी
सोनेतारण कर्जाचा कालावधी हा साधारणपणे 1 वर्षाचा म्हणजेच १२ महीन्याचा असतो. म्हणजेच 12 महिने पूर्ण होण्याच्या आत आपल्याला सोनेतारण कर्ज भरावे लागते. जर आपण 12 महिन्याच्या आत हे सोनेतारण कर्ज व्याजासकट भरू शकलो नाही तर, आपण हे सोनेतारण कर्ज परत व्याज भरून नूतनीकरण करू शकतो.
हा एक फायदा सोनेतारण कर्जाचा आहे. जर आपण आपली मुदत संपली तरीही सोनेतारण कर्जाची रक्कम भरून सोने सोडवले नाही किंवा ते कर्ज परत नूतनीकरण केले नाही तर प्रथम बँक आपल्याला नोटीसा पाठवते. जर त्या नोटिसांना आपण उत्तर दिले नाही किंवा त्याबाबत काहीही हालचाल केली नाही तर, बँक त्या सोन्याचा लिलाव करून आपले सोनेतारण कर्ज वसूल करते. त्यासाठी प्रथम आपल्याला नोटीस पाठवली जाते व नोटीस पाठवल्यानंतर बँक कारवाई करते.
आपण आपले सोनेतारण कर्ज आपल्या मुदतीच्या आतही भरू शकतो .आपण आपले कर्ज मुदतीच्या आत भरले तरी बँक आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड वसूल करत नाही. म्हणजेच दुसऱ्या कर्जामध्ये आपण कालावधीच्या आत जर कर्ज फेडले तर बँक आपल्याकडून दंड वसूल करत असते.तसे या सोने तारण कर्जामध्ये नाही. म्हणजेच सोनेतारण कर्जावर कोणतेही फोरक्लोजर असे चार्जेस घेत नाहीत.
- एसबीआय बँक.
- ॲक्सिस बँक.
- एचडीएफसी बँक.
- मुथुट फायनान्स गोल्ड लोन. मन्नपुरम गोड लोन.
- बँक ऑफ महाराष्ट्र
अशा प्रकारच्या बँका आपल्याला सोनेतारण कर्ज उपलब्ध करून देत असतात. तसेच पतसंस्था व जिल्हा बँका सुद्धा आपल्याला सोनेतारण कर्ज उपलब्ध करून देत असतात.
शेतकऱ्यांसाठी कृषी सुवर्ण योजना
बऱ्याच राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांसाठी “कृषी सुवर्ण योजना” सुरू केलेली आहे.या योजनेनुसार शेतकऱ्यांना कमी व्याजदराने म्हणजेच फक्त 7 % व्याज दराने सोनेतारण कर्ज दिले जाते . यासाठी सोन्याबरोबरच शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
शेती नावावर असल्याचा पुरावा बँकेत जमा केला की व योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केली की या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत कमी व्याजदरात शेतकरी जमीन खरेदी, सिंचनासाठी विविध उपकरणे, यंत्रसामुग्री आणि कच्च्या मालाची खरेदी अशा विविध क्षेत्रांसाठी सोनेतारण कर्ज घेऊ शकतो. त्यामुळे शेतकरी वर्गाने या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा असे मला वाटते त्यासाठी बँकेत जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी.
मला आशा आहे की ,मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी होईल. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.
धन्यवाद!!!