Personal loan information in marathi

वैयक्तिक कर्ज संपूर्ण माहिती | Personal loan information in marathi

Personal loan information in Marathi: मित्रांनो नमस्कार, कसं काय आहे, मजेत ना! अहो असणारच आमच्या वेबसाईट वरील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल ना! चला तर मग या ज्ञानमय प्रवासाला सुरुवात करूयात !!!

मित्रांनो, आजच्या परिस्थितीत व पूर्वीच्या परिस्थितीत खूप बदल झालेला आपल्याला दिसत आहे. पूर्वी व्यक्तीच्या गरजा या मर्यादित होत्या. “आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या”  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अचानक मला या जुन्या गाण्याची आठवण का झाली. पण आजचा लेख हा त्या संदर्भातच आहे.

पूर्वी व्यक्तीच्या गरजा या मर्यादित होत्या. त्या काळात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा या मर्यादित स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्या काळात उत्पन्नातील कौटुंबिक खर्च वजा होऊन बचत होत होती.

परंतु बदलत्या काळानुसार माणसाच्या गरजा या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. जसे की, चांगले घर ,चांगले कपडे, फिरायला स्वतःची गाडी मग ती दोन चाकी असो किंवा चार चाकी. अशा अनेक गरजा वाढल्यामुळे प्रत्येकाचा खर्च हा मर्यादित न राहता अमर्यादित स्वरूपाचा झाला आहे.

तसेच महागाईचा उच्चांक हा दिवसेंदिवस कमी न होता वाढतच चाललेला आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कुटुंबाच्या वाढलेल्या गरजा भागवता भागवता बचत ही काळानूरूप कमी होत चाललेली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पाऊल उचलावे लागते.

आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे हे आवश्यक असतात .जसे की गाडी घेणे, घर घेणे ,घरातील वस्तू घेणे,आजारपण इत्यादीसाठी आपल्याकडे कधी कधी पैसे हे लगेच उपलब्ध होत नसतात.

त्यावेळेस त्याला पर्याय म्हणून घर बांधायचे असेल तर, आपल्याला गृह कर्ज काढावे लागते .गाडी घ्यायची असेल तर, वाहन कर्ज काढावे लागते. म्हणजे आता कोणतेही काम करायचे झाले की, पुरेसे पैसे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला कर्ज हे घ्यावेच लागते .

आजच्या लेखांमध्ये अशाच कर्जाविषयी म्हणजे लोन विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ते म्हणजे “वैयक्तिक कर्ज ” (Personal loan information in marathi)

वैयक्तिक कर्ज म्हणजे काय? वैयक्तिक कर्जासाठी एलिजीबिलिटी क्रायटेरिया काय लागतो? वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? वैयक्तिक कर्जाचा व्याजदर किती आहे? वैयक्तिक कर्जाचे फायदे काय? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे व या वैयक्तिक लोन विषयी सर्व माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. चला तर, या ज्ञानमय प्रवासाची आपण सुरुवात करूयात!!!

वैयक्तिक कर्ज म्हणजे काय? What is Personal loan

जे लोन किंवा कर्ज आपण घेतो त्यासाठी आपल्याला काहीही तारण ठेवावे लागत नाही. त्या लोनला किंवा कर्जाला आपण पर्सनल लोन

जे लोन किंवा कर्ज आपण घेतो त्यासाठी आपल्याला काहीही तारण ठेवावे लागत नाही. त्या लोनला किंवा कर्जाला आपण पर्सनल लोन (Personal loan) म्हणजेच वैयक्तिक कर्ज असे म्हणतो. वैयक्तिक कर्ज म्हणजे तुम्ही कोणत्याही कारणासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकता .कारण हे कोणतेही असले तरीही चालते .

म्हणजेच वैयक्तिक कर्ज असे म्हणतो. वैयक्तिक कर्ज म्हणजे तुम्ही कोणत्याही कारणासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकता .कारण हे कोणतेही असले तरीही चालते .

त्याच्यात कोणतीही अट नसते .जसे की, वाहन कर्ज घेताना आपण ते वाहनासाठीच घेतो व गृह कर्ज घेताना आपण ते घरासाठीच घेतो. म्हणजे हे कर्ज आपल्याला फक्त घर किंवा कार घेण्याची अनुमती देत असते. व्यवसायासाठी काढलेले कर्ज हे तुम्हाला व्यवसायामध्येच गुंतवावे लागते .पण वैयक्तिक कर्ज हे आपण कोणत्याही कारणासाठी घेऊ शकतो. आपल्या वैयक्तिक कर्जासाठी एक प्रकारे पैसे उधार घेणे व नंतर त्या रकमेची ठरवून दिलेल्या हप्त्यामध्ये परतफेड करणे हे वैयक्तिक कर्जाचा उद्देश असतो.

वैयक्तिक कर्जाचे फायदे व तोटे

आपल्या आयुष्यात कोणतीही वेळ ही सांगून येत नसते. अनियोजित किंवा अचानक कोणताही खर्च पुढे येतो. अचानक लग्नाचा खर्च समोर येऊ शकतो. आजारपण येऊ शकते. तसेच आपल्याला जर सहलीला किंवा पर्यटनासाठी जाण्याची इच्छा झाली तर अशा अनेक कारणांसाठी पैशाची कमतरता भासली तर आपण वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करू शकतो. कारण हे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट तारण ठेवण्याची गरज नसते.

योग्य ती कागदपत्रांची पूर्तता केली की तुम्हाला कर्ज हे लगेच मंजूर होत असते .तसेच हे कर्ज आपल्याला जलद गतीने पैसे मिळवून देते. अशा अचानक आलेल्या खर्चाला अर्थसाहाय्य करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज आपल्या अपेक्षेप्रमाणे लग्नाच्या कार्यक्रमाचा बेत आपण करू शकतो. तसेच घराचे नूतनीकरण किंवा इंटरियर डेकोरेशन ,फर्निचर यांसारख्या गोष्टींसाठी सुद्धा आपण खर्च करू शकतो. टीव्ही, फ्रीज ,लॅपटॉप यांसारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करू शकतो.

पर्सनल लोन हे आपण हप्त्याहप्त्याने पैसे भरून फेडू शकतो म्हणजे आपल्याला एकदम कर्ज फेडण्याची गरज लागत नाही पर्सनल लोन चा रेट हा क्रेडिट कार्ड पेक्षा कमी असतो हा एक त्याचा फायदा आहे.

 वैयक्तिक कर्जाचा कालावधी व हप्त्याची रक्कम आपल्या गरजेनुसार घेऊ शकतो लॉन्ग टर्म साठी म्हणजे 60 महिन्यांच्या कालावधीसाठी सुद्धा आपण हे कर्ज घेऊ शकतो. वैयक्तिक कर्ज देताना कागदपत्रे विचारात न घेता तुमचा पगार हा पाहिला जातो. त्यामुळे जास्त कागदपत्रांची जमवाजमव करावी लागत नाही.

जसे वैयक्तिक कर्जाचे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे तोटेही आहेत .वैयक्तिक कर्ज हे घेताना आपणास काहीही तारण ठेवावे लागत नाही म्हणून हे असुरक्षित कर्ज असे समजले जाते .तसेच वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा इतर कर्जा पेक्षा जास्त असतो. त्याच्यावर आकारली जाणारी फी व दंड हा सुद्धा जास्त आकारला जातो. ठरवून दिलेला हप्ता हा दर महिन्याला न चुकता भरावाच लागतो .परत फेड न झाल्यास इंटरेस्ट रेट वाढतो.

वैयक्तिक कर्ज अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • पत्त्याचा पुरावा:- लाईट बिल, रेशनिंग कार्ड.
  • ओळखीचा पुरावा:- आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट ,ड्रायव्हिंग लायसन ,मतदार ओळखपत्र. मागील 3 महिन्यांची पगार स्लिप.
  • मागील 3 ते 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
  • पासपोर्ट साईज आकाराचे फोटो.
  • स्वयंरोजगार किंवा व्यवसायिक असताल तर मागील तीन वर्षाचे आयटी भरलेले कागदपत्र.
  • 100 रुपयाचे 2 स्टॅम्प.

या डॉक्युमेंट्स मध्ये वेळोवेळी बदलही होऊ शकतात.

पर्सनल लोन घेण्यासाठी पात्रता काय लागते? Personal loan Requirement

पर्सनल लोन घेण्यासाठी काही आवश्यक बाबी तपासल्या जातात. त्या म्हणजे पहिली आपली वयोमर्यादा. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा ही 21 ते 60 वर्ष असते. 21 वर्षाच्या पुढील व साठ वर्षाच्या आतील सर्व नागरिकांना वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात. ज्या व्यक्तींनी दोन वर्ष काम केले आहे व वर्तमान स्थितीतही ते काम करत आहेत असे लोक वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात. ज्यांचे मासिक पेमेंट हे 25000 पेक्षा जास्त आहे अशी लोक वैयक्तिक कर्जासाठी पात्र असतात.

पर्सनल लोन देताना सर्वात प्रथम आपला सिबिल स्कोर हा पाहूनच कर्ज मंजूर केले जाते. आपण यापूर्वी लोन घेतले आहे का? घेतले असेल तर ते वेळेवर परत केले आहे का ?आपण लोन किती वेळा घेतले आहे? या सर्व बाबी लक्षात घेऊनच आपल्याला लोन द्यावे की नाही याची खातरजमा झाल्यानंतर आपल्याला लोन दिले जाते .म्हणजेच पर्सनल लोन घेताना सर्व हे सिबिल स्कोर वर अवलंबून असते. कारण पर्सनल लोन देताना बँका या आपल्याकडून कोणतीही वस्तू तारण ठेवून घेत नसते. जर आपला क्रेडिट स्कोर चांगला असेल तरच आपल्याला पर्सनल लोन मिळते नाही तर ते नाकारले जाते.

सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान असणे गरजेचे असते. सिबिल ही एक अशा प्रकारची संस्था आहे जी तुमच्या कर्जाचा इतिहास तपासून तीन अंकी सिबिल स्कोर ठरवून देते. सिबिल स्कोर हा पर्सनल लोन घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणून सिबिल स्कोर हा सर्वात महत्त्वाचा आहे. जेणेकरून तुम्हाला पर्सनल लोन लगेच मिळते. तुमचा जर सिबिल स्कोर कमी झाला असेल तर तुम्हाला पर्सनल लोन ही कमी मिळते. पर्सनल लोन देताना आपला पगार किती आहे. त्याच्यावरच आपल्या कर्जाची रक्कम, परतफेड चा कालावधी व व्याजदर ठरवण्यात येतो. शक्य असेल तर हमीदार किंवा जामीनदारांची मदत घ्या त्यामुळे लोन घेण्यास मदत होईल.

Personal loan घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड असते. पॅन कार्ड असेल तरच आपल्याला वैयक्तिक कर्ज मिळते. त्यामुळे आपल्याकडे पॅन कार्ड असणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Personal loan घेताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी

बऱ्याच बँका व पतसंस्था ग्राहकांना नवनवीन योजना देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. ई-मेल ,एसएमएस व फोन द्वारे बँका ग्राहकांची संपर्क साधून कर्ज घेण्यास प्रोत्साहित करत असतात .अशा वेळेस लोन घेताना त्या योजनांना आकर्षित न होता त्या गोष्टीच्या निगडित सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून सहानिशा करावी मगच कर्ज घेणे.

कधी कधी कर्ज देणारे 0% EMI असे आमिश दाखवून ग्राहकांना अडकवण्याचा प्रयत्न करत असतात .परंतु आरबीआयने अशा योजना देणे कधीच बंद केले आहे. तुम्हाला जर असे कोणी आमिश दाखवले तर सावध रहा. उदाहरणार्थ अशा योजनेद्वारे जर तुम्ही 6 महिन्यांसाठी 50000 घेतले तर त्याला 2000 प्रोसेसिंग फी आकारली जाते व व्याजदर 14 % पेक्षाही जास्त आकारले जाते.

पर्सनल लोनला फक्त प्रोसेसिंग फी तुम्हाला द्यावी लागते.. परंतु काही बँका या प्रोसेसिंग फी बरोबरच इतर खर्चही सांगतात .त्यामुळे कर्ज घेताना या गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे .

आपण जर आपल्या मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड केली तर त्यांना अपेक्षे एवढे व्याज मिळत नाही. त्यामुळे ते एक युक्ती वापरतात. ते म्हणजे “फोरक्लोजर चार्जेस”.     

फोरक्लोजर चार्जेस म्हणजे काही बँका या आपले नुकसान भरून काढण्यासाठी फोरक्लोजर चार्जेस लावतात. म्हणजेच आपण कर्जाची लवकर परतफेड केली तर देणे करी आपल्याला काही पैसे फी म्हणून घेतात. यालाच फोरक्लोजर चार्जेस असे म्हणतात. त्यामुळे कर्जफेडीसाठी आपण जर 2 किंवा 3 वर्षाचा काळ ठरवला असेल तर योजना निवडताना फोरक्लोजर चार्जेस कमी असलेली निवडावी.

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

Personal loan घेण्यासाठी आपण ऑफलाइन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.

अर्ज करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या बँकेतून कर्ज घेणार आहे त्या बँकेत आपले खाते असणे गरजेचे आहे.

ऑफलाइन प्रक्रिया

ऑफलाइन प्रक्रियेमध्ये तुम्ही आपल्याला पाहिजे असलेल्या बँकेत जाऊन शाखेला भेट देऊ शकता व त्या बँकेत गेल्यानंतर वैयक्तिक कर्जासाठी अर्ज घ्यावा व अर्ज करताना बँकेला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी व त्यानुसार आपली पर्सनल लोन ची प्रक्रिया सुरू होते. सर्व कागदपत्रांची पडताळणी व मूल्यमापन झाल्यानंतर आपल्याला पर्सनल लोन दिले जाते. व आपल्या खात्यात आपल्या कर्जाची रक्कम जमा केली जाते .

ऑनलाइन प्रक्रिया

या प्रक्रियेमध्ये आपल्याला बँकेच्या संकेतस्थळावर पर्सनल लोन साठी अप्लाय करावे लागते. त्यासाठी आपल्याला आपली केवायसी पूर्तता करावी लागते. नंतर सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती भरावी लागते व त्यानंतर अर्ज सबमिट करावा लागतो. बँक कर्मचाऱ्याद्वारे अर्ज पडताळणी झाल्यानंतर आपले मंजूर झालेले कर्ज थेट आपल्या खात्यावर जमा केले जाते.

बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक ,इंडियन बँक ,पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, युनियन बँक यांसारख्या भारतीय बँका आपल्याला Personal loan देत असतात. तसेच जिल्हा बँका व पतसंस्था ही सुद्धा हे वैयक्तिक लोन देत असतात. प्रत्येक बँकेचे व्याजदर हे सारखे नसून त्यांच्यामध्ये तफावत असते. कोणी 10.75% व्याजदर आकारते तर कोणी 10.50% व्याजदर आकारते. त्यामुळे प्रत्येक बँकेच्या व्याजदरामध्ये आपल्याला तफावत आढळत असते .

आशा आहे की, आम्ही दिलेल्या या वैयक्तिक कर्ज माहिती (Personal loan information in marathi) चा आपल्याला नक्कीच फायदा होईल .तुम्हाला जर आमची ही माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांना व कुटुंबांना ही माहिती नक्कीच शेअर करा .

धन्यवाद!!!!!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *