हा सुविचार आपणलहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि या सुविचाराचे खरे महत्व आज आपल्याला समजले आहे. एक सूक्ष्म घातक विषाणू ही आपले आरोग्य बिघडवू शकतो.
त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आजच्या धावत्या जगाला पूर्णपणे बंद करूनसंपूर्ण दुनियेची झोप ज्याने उडवली असा व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. अतिशय सूक्ष्म आणि आपल्या डोळयांनाही न दिसणारा असा कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस हा दिसायला खूप सूक्ष्म असला तरी तो अत्यंत घातक असा विषाणू आहे.
तर मित्रांनो आज आपण ह्याच कोरोना वायरस वर मराठी निबंध बघणार आहोत. हा Marathi Essay on Coronavirus तुम्ही शाळेमध्ये किंवा निबंध स्पर्धेमध्ये वापरू शकता.
Table of Contents
Marathi essay on coronavirus
WHO ने घोषित केले आहे की हा विषाणू साथीच्या रोगाचा विषाणू आहे. या विषाणूचा संसर्ग सर्वप्रथमडिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहान या शहरातझाला. हा संसर्ग वाढत जाऊन पुढे सर्व देशांमध्ये पसरला.आज संपूर्ण जग या रोगाचा सामना करत आहे.
आज पर्यंत मानवाने अनेक संकटांचा सामनाकेला आहे आणि त्या संकटातून मुक्त होऊन तो पुढेगेला आहे. परंतु कोरोना हा विषाणू इतका घातक आहे की त्यामुळे बऱ्याच माणसांचा मृत्यू देखील होत आहे. म्हणूनच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
ताप,सर्दी-खोकला, घश्यामध्ये खवखव डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, तोंडाची चव जाणे हीकोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. हा विषाणू संसर्गजन्यअसल्यामुळे एक व्यक्ती दुस-या व्यक्तीच्या संपर्कातआल्यामुळे या विषाणूचा फैलाव होऊ शकतो.त्यामुळे लोकांना जास्त खबरदारी घेण्याची गरजनिर्माण झाली आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा वाढताप्रसार पाहून आपण स्वतःची काळजी घेणे आणि याविषाणूचा प्रसार थांबविणे हीच आपली जबाबदारी आहे.
एखादया व्यक्तीला या विषाणूची लागणझाल्यास त्याची लक्षणे दिसून येण्यास काही दिवसलागतात. त्या कालावधीत जर ती व्यक्ती इतर लोकांच्या संपर्कात आली तर त्या सर्व लोकांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण लोकांशी संपर्क टाळणे आणि स्वतःची काळजी घेने आवश्यक आहे.
मधूमेह, अस्थमा व आणखी काही आजारअसणा-या व्यक्तींना तसेच लहान मुले आणि वृध्दमाणसांना या विषाणूची लागण लवकर होते. त्यामुळे अशा लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.आपल्या देशाचे डॉक्टर, नर्सेस, आरोग्यकर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी कोरोना व्हायरसविरूध्द लढण्यासाठी रात्रं-दिवस प्रयत्न करत आहेत. भारत सरकारने अनेक नियम सुरू केले आहेत. खरोखरच जर आपणास या रोगाला संपवायच असेल तर आपण खाली दिलेल्या सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
१) बाहेरून आल्यानंतर नेहमी आपले हात २०- ३० सेकंद नचुकता धुणे.
२) बाहेर जाताना नेहमी मास्कचा वापर करणे.
३) आपल्या हातांचा स्पर्श तोंड, नाक, डोळयांना नाही होणार याची काळजी घेणे.
४) सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
५) आपले घर आणि घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे.
अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या आहारात योग्य बदल करावे, आपली रोगप्रतिकारक शक्ती पोषक आहार घेऊन वाढविणे गरजेचे आहे. आपण आपल्याच घरात राहूनच सरकारला कोरोनापासून वाचण्यासाठी मदत करू शकतो, जेणेकरून हा कोरोना व्हायरस देशातून आणि संपूर्ण जगातून नाहीसा होईल.
करोना महामारी व त्यामुळे झालेल्या लाॅकडाउन मुळे बरेच व्यवसाय व उद्योगधंद्यांवर देखील गंभीर दुष्परिणाम झाले. जवळपास एक करोड च्या वर लोक अतिशय गरिब अवस्थेत ढकलले गेले. जगातील निम्म्याहून अधिक कंपन्या बंद पडण्याच्या अवस्थेत आल्या. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत सीमा बंदी, व्यापार केंद्रे बंद, बाजारपेठा बंद यामुळे शेतकर्यांनी कष्टाने पिकवलेला माल तसाच पडून राहिला व देशातील अन्नसाखळी बिघडली.
25 मार्च 2020 नंतर जेव्हा देशात पहिल्यांदा 21 दिवसांचे लोक डाऊन करण्यात आले त्यानंतर उद्योगधंद्यावर गंभीर परिणाम झाला शेअर मार्केट फेब्रुवारी ते मार्च दरम्यान रेकॉर्ड ब्रेक करीत खाली घसरले व नंतर एप्रिल ते मे पर्यंत चांगले रिकव्हर सुद्धा झाले त्यानंतर जेव्हा फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थसंकल्प घोषित झाला तेव्हा निफ्टीने तिचा उच्चांक गाठला.
शेअर मार्केट खुप घसरल्यामुळे लॉकडाऊन च्या काळात सोन्याचे दर ही खूप वाढले होते.
लाॅकडाऊन दरम्यान भारताचा Growth rate 3.1 टक्क्यांनी घसरला . nomura नुसार एप्रिल महिन्यात भारताची इकॉनोमिक क्टिविटी 82.9 पासून 44.7 पर्यंत घसरली.
तसेच बेरोजगारी 6.7 टक्के पासून 26 टक्के पर्यंत वाढली आहे व 14 करोड पेक्षा जास्त लोकांना त्यांची नोकरी सोडावी लागली आहे. Bharat forge,Larsen and turbo,Aditya Birla group, UltraTech cement, grasim industries, BHEL, Tata motors इत्यादी भारतातल्या मोठ्या कंपन्यांना तात्पुरते उत्पादन कमी करावे लागले आहे.
12 मे 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान-मोठ्या उद्योगधंद्यांसाठी वीस लाख करोड रुपयांचा निधी घोषित करण्याचे ठरवले.
लाॅकडाऊनची पहिली फेज 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत होती. त्यानंतरची दुसरी फेज 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत होती व तिसरी पेज 3 मे ते 30 मे पर्यंत होती. त्यानंतर एक जून नंतर अनलॉक सुरू झाले व हळूहळू हॉटेल्स, शाळा, वाहतूक, कॉलेजेस, बाजारपेठा सुरू करण्यात आली.
२) शिक्षण-
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जगातील बऱ्याच देशांमध्ये शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आली यामुळे जगातील 83 करोड पेक्षा जास्त शिकणाऱ्या लोकांवर परिणाम झाला.
लोकडाऊनमुळे सगळ्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या इंजीनियरिंग, मेडिकल, ॲग्री, लो, फॅशन, डिझाईनिंग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील कॉलेज बंद ठेवण्यात आली व परीक्षा रद्द झाल्या त्यामुळे सर्व विद्यापीठांचे वेळापत्रक ढासळलेली.
ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे कंपन्यांनी कॉलेजमधील नवीन मुलांची भरती करणे कमी केले याचा परिणाम विद्यापीठांवर झाला.
आर्थिक समस्यांमुळे अनेक पालकांना कॉलेजची फी भरता आली नाही त्यामुळे अनेक कॉलेजांनी वर्किंग कॅपिटल नसल्यामुळे शिक्षकांचा पगार थकवला.
लोकडाऊन मध्ये शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाची खूप मदत झाली जसे कि ए-लर्निंग. वर्क फ्रॉम होम स्टडी फ्रॉम होम यांसारख्या संकल्पनांमुळे विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची मदत झाली. इंटरनेटने विद्यार्थ्यांची व शिक्षकांच्या बऱ्याच अडचण दूर केली.
तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
पावसाळा या निबंधात आपण सर्वात सुंदर ऋतूबद्दल बोलणार आहोत. पावसाळा हा ऋतू सर्व ऋतूंपैकी माझा आवडता ऋतू आहे, कारण पावसामुळे झाडे, वनस्पती आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या वाढीस मदत होते. उन्हाळ्यात कोरडी आणि निर्जीव झालेली जमीन पावसाच्या आगमनाने हिरवीगार होऊन जीवनाने झाकून जाते. तर या ‘माझा आवडता ऋतू पावसाळा’ निबंधात आपण पावसाळ्याचे महत्त्व, महिने आणि…
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता. “माझा आवडता खेळ” हा निबंध आम्ही इयत्ता १ली, २री, ३री, ४थी, ५वी,…
स्वामी विवेकानंद मराठी निबंध गगनाला भिडलेले ‘महाभारत’ म्हणजेच स्वामी विवेकानंद बारा जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. स्वामींचे अवघे जीवन हा पराक्रमाचा, पौरुषाचा, ‘धर्म, होता. राष्ट्र आणि संस्कृती’ यांच्या जयघोषाचा एक महोत्सवकसे घडले, वाढले विवेकानंद ?केले तरी काय त्यांनी आपल्या योग्यतेच्या सिद्धतेसाठी, संवर्धनासाठी? तसे पाहू जाता ते कलकत्ता विद्यापीठाचे केवळ पदवीधर होते. येथेच त्यांचे शिक्षण थांबले होते….
पुस्तकाची आत्मकथा | पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध | pustakachi atmakatha | pustakachi atmakatha in marathi | pustak ki atmakatha in marathi | पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी | pustkache aatmkathan marathi | pustkache aatmkathan marathi | pustakachi atmakatha nibandh marathi | मी पुस्तक बोलतोय निबंध लेखन प्रत्येकाला जीवनात वेळोवेळी थोडा आनंद हवा असतो. आपण विविध गोष्टींमधून…
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत माझी आई मराठी निबंध म्हणजेच Marathi Essay On My Mother माझी आई…
नमस्कार मित्रांनो, शब्दक्षर वर तुमचे स्वागत आहे. अनेकदा आपल्याला शाळेत कल्पनातम्क निबंध लिहायला सांगितले जातात. त्यामध्ये सूर्य उगवला नाही तर असा निबंध नेहमी असतो. माणसांना सूर्या बद्दल नेहमीच कुतुहूल असते. सूर्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातही होत नाही त्यामुळे, खरे तर सूर्य उगवला नाही तर हि कल्पना करणे सुद्धा खूप कठीण आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी जर सूर्य…