{Essay} माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध | My Favourite Animal Lion
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध
माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध | My Favourite Animal Lion essay in marathi | essay on lion in marathi | जंगलचा राजा सिंह निबंध मराठी या विषयावर तुम्ही हा निबंध वापरू शकता.
माझा आवडता प्राणी-जंगलचा राजा सिंह मराठी निबंध
‘हत्तीला पाहावे पाण्यात तसेच सिंहाला पाहावे वनात’. सिंहाला भरभक्कम मान, त्या मानेवर भरदार आयाळ, तीक्ष्ण नख्या असलेले रुंद पंजे असतात. सिंहाला वनांचा राजा असे म्हणतात सिंह चित्रात पाहूनही हृदयात धडकी भरते. आपल्या भेदक नजरेने समोरच्याला घायाळ करताना त्याचा आळशी स्वभाव मनाला खटकतो.
वनराज सिंह जितका दिमाखदार डौलदार दिसतो तितकाच तो हिंसकही असतो. जेव्हा तो धीम्या गतीने वनातून भ्रमण करत असतो त्यावेळी हत्ती गेंडयासारखे महाकाय प्राणीही त्याच्या वाट्याला जात नाहीत. सिंहाच्या एका डरकाळीने सारे जंगल हादरुन जाते. परंतु सिंहापेक्षा सिंहीण जास्त मेहनती असते. आपल्या कुटुंबासाठी तीच शिकार शोधून आणते. सिंह दिसायला भारदस्त असला तरी तो अजिबात क्रियाशील नसतो. आळशी असतो. सिंहिणीने केलेल्या शिकारीवरच तो ताव मारतो व दिवसभर लोळत राहतो.
सिंहाचे एक वैशिष्टय की तो विनाकारण जंगलातील निरुपद्रवी प्राण्यांना मारत नाही, तर सिंह भूक लागल्यावरच शिकार करतो. सिंहाचे तोंड भेदक दिसत असले तरी त्याचा पार्श्वभाग खूप लांब आणि प्रमाणबद्ध असतो. सिंह गडद पिवळसर रंगाचा असून त्याचे सर्व शरीर केसाळ असते. त्याचे दातच इतके तीक्ष्ण आणि टोकदार असतात की एकदा ताव्यात आलेली शिकार सहजासहजी त्याच्या तावडीतून सुटत नाही. सिंह वाघ चित्त्या प्रमाणे धावत नाही किंवा वाघाप्रमाणे शिकारीचा पाठलागही करत नाही. तसेच वाघ – बिबट्याप्रमाणे तो चतुरही नाही.
नुकत्याच झालेल्या सिंहाच्या जनगणनेनुसार गुजरात राज्यातील गिरच्या जंगलात ५२३ सिंह असल्याची नोंद आहे.
हे नक्की वाचा :
- माझा आवडता प्राणी उंट मराठी निबंध
- ५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी
- माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध
- जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध
- आपला राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध
- आमची कपिला गाय मराठी निबंध
- माझा आवडता पाळीव प्राणी – मराठी निबंध
तुम्हाला हा माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
2 Comments