zodiac signs in Marathi
| |

12 zodiac signs in Marathi | मराठी बारा राशींची नावे व चिन्हे

ज्योतिष शास्त्र मध्ये एकूण बारा प्रकारच्या राशी आहेत, प्रत्येकाच्या जन्मकुंडलीवरून म्हणजेच जन्माची तारीख, वेळ, महिना इत्यादी गोष्टी पाहून त्याची रास ठरवली जाते.

प्रत्येक राशीचे एक वेगळे वैशिष्ट्य व आहेत. त्यानुसार प्रत्येकाचा स्वभावसुद्धा लहानपणापासून वेगळा असतो असे जोतिष शास्त्रात मानले जाते.

Zodiac Signs म्हणजे नेमके काय?

इंग्रजी भाषेत मराठी राशीला ‘Zodiac Signs in Marathi’ असे म्हणाले जाते. तर आपण जाणून घेऊया राशी किंवा रास म्हणजे नेमके काय ?

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात.

या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात.

मराठीतील बारा राशींची नावे व चिन्हे :


zodiac signs in Marathi

१. मेष/Aries

 मेष राशीचे व्यक्ती कष्टाळू असतात. परंतु धैर्याचा कमतरतेमुळे हे लोक लवकर परिणाम न दिसल्याने कोणतेही काम मध्येच अर्धवट सोडून देतात.


zodiac signs in Marathi

२. वृष/Taurus

वृष राशीचे चिन्ह बैल असते. या राशीचे लोक कठीण कार्यही अतिशय सहजतेने पूर्ण करतात. या लोकांची उंची थोडी कमी असते परंतु स्वभाव अत्यंत आकर्षक असतो.


zodiac signs in Marathi

३. मिथुन/Gemini

मिथुन राशीचे चिन्ह स्त्री पुरुष आहे. मिथुन राशीचे लोक बहुमुखी प्रतिभावान असतात. कोणावरही विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवण्यात त्यांचा कल असतो.


zodiac signs in Marathi

४. कर्क/Cancer

कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा गुंतागुंतीचा असतो. हे लोक आपले काम कोणत्याही पद्धतीने काढून नेताता. सतत करू करणे हा त्यांचा स्वभाव असतो.


zodiac signs in Marathi

५. सिंह/Leo

सिंह राशीचे राशी चिन्ह सिंह आहे. ज्याप्रमाणे सिंह जंगलाचा राजा असतो त्याच पद्धतीने सिंह लग्न असणारे लोक राजाप्रमाने जीवन जगतात. यांचा स्वभाव नरम आणि निडर असतो. व वेळप्रसंगी हे लोकांना मदतही करतात. 


zodiac signs in Marathi

६. कन्या/Virgo

कन्या राशीचे चिन्ह स्त्री आहे. या लोकांचा शांत स्वभाव हा मुख्य गुण असतो. या राशीचे लोक सरळ भोळे आणि जमिनीशी जुळलेले असतात. यांची काम करण्याची गती हळुवार असते परंतु आपल्या कामाच्या प्रति ते अतिशय संवेदनशील असतात. 


zodiac signs in Marathi

७. तूळ/Libra

तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. या तूळ लग्न असणाऱ्या लोकांचा स्वभाव गंभीर असतो. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची तयारी असते. सर्वांसोबत सारखा व्यवहार आणि व्यवस्थित जीवन हेच त्यांचे प्रमुख गुण आहेत. 


zodiac signs in Marathi

८. वृश्चिक/Scorpio

कोणासमोरही आपल्या मनातील गोष्टी न सांगणे व स्वतः साठी अनुकल असलेल्या संधीच्या शोधात असणे ह्या लोकांचे मुख्य स्वभाव आहे. यांच्या स्वभावात थोडा कडूपणा असतो. स्वभावात उग्रता असल्याने त्यांची नेतृत्व शक्तीही चांगली असते. 


zodiac signs in Marathi

९. धनु/Sagittarius 

धनु लग्न असणारे व्यक्ती आपल्या कार्याला एक ध्येय म्हणून ठेवतात. यांना आपला वेळ वाया घालवणे अजिबात आवडत नाही. हे लोक अतिशय श्रेष्ठ आणि ज्ञानी असतात. परंतु आपल्या गुणांमुळे यांचा अहंकार ही बऱ्याचदा वाढून जातो.


zodiac signs in Marathi

१०. मकर/Capricorn 

मकर राशीचे चिन्ह मगर आहे. मकर लग्न असणारे लोक खूप मेहनती असतात. त्यांचा स्वभाव कठोर असतो. कोणाकडे लक्ष देण्याआधी हे स्वतःचे हित पाहतात. जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता लढण्याची हिम्मत यांच्यात असते. 


zodiac signs in Marathi

११. कुंभ/Aquarius 

स्वच्छ मन आणि नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करणारे कुंभ लग्न असणारे जातक साधी प्रवृत्तीचे असतात. यांचे मन अतिशय स्वच्छ असते आणि कोणाचीही निंदा, चुगली न करणे यांच्या स्वभावातच असते. सदैव समाज आणि सर्वांना हितकारी ठरतील अशी कामे हे लोक करतात.


zodiac signs in Marathi

१२. मीन/Pisces 

मीन राशीचे चिन्ह दोन माश्यांची जोडी आहे. या लोकांचा स्वभावही माश्या प्रमाणेच असतो. हे लोक सदैव स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक गुणांनी भरलेले मीन राशीचे जातक गुरु समान असतात. बोलण्यात गोडी आणि स्वभावात गंभीरता असल्याने प्रत्येक जण यांची गोष्ट लक्ष देऊन ऐकतात.


हे पण वाचा :

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे


मराठीतील राशींची इंग्रजी नावे कशी आहेत? zodiac signs in Marathi

आपण मराठी मध्ये राशींची नावे जाणून घेतली आता आपण. मराठीतील बारा राशींची नावे इंग्रजी मध्ये बघणार आहोत.

Sr. No.Zodiac SingsZodiac Signs In MarathiNames of ZodiacBirth Period
1♈︎मेष राशी {Mesh Rashi}AriesMarch 21 – April 20
2♉︎वृषभ राशी {Vrishabha Rashi}TaurusApril 21 – May 20
3♊︎मिथुन राशी {Mithun Rashi}GeminiMay 21 – June 20
4♋︎कर्क राशी {Kark Rashi}CancerJune 21 – July 22
5♌︎सिंह राशी {Simha Rashi}LeoJuly 23 – August 23
6♍︎कन्या राशी {Kanya Rashi}VirgoAugust 24 – September 22
7♎︎तूळ राशी {Tula Rashi}LibraSeptember 23 – October 23
8♏︎वृश्चिक राशी {Vrischika Rashi}ScorpioOctober 24 – November 22
9♐︎धनु राशी {Dhanu Rashi}SagittariusNovember 23 – December 21
10♑︎मकर राशी {Makar Rashi}CapricornDecember 22 – January 19
11♒︎कुंभ राशी {Kumbha Rashi}AquariusJanuary 20 – February 18
12♓︎मीन राशी {Meen Rashi}PiscesFebruary 19 – March 20

राशीवरून नावातील आद्याक्षर

राशीअक्षरे
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तुला
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
मीन
, ल,
ब, व, उ,
क, छ, घ
ड, ह
म, ट
प, ठ, ण
र, त
न, य
भ, ध, फ, ढ
ख, ज
ग, श, स
द, च, झ, थ

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *