{2024} छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.
खाली दिलेले निबंध हे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर निबंध, युगपुरुष – छत्रपती श्रीशिवाजी महाराज या विषयांकरिता देखील वापरू शकता.
“छत्रपती शिवाजी महाराज” हा निबंध आम्ही इयत्ता १ली, २री, ३री, ४थी, ५वी, ६वी, ७वी, ८वी, ९वी, १०वी, ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ३००, ४००, ५०० व ६०० शब्दांमध्ये पुरवला आहे.
निबंधलेखनातील महत्वाचे मुद्दे –
१) हस्ताक्षर सुंदर असावे
२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट
३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.
४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.
छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध
स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव “शिवाजी भोसले” असे होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते.
शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. त्यांच्या एकूण ८ पत्नी होत्या. शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवात येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली. त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली. इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला, आणि महाराज्यांनी स्वराज्याची भवानी केली. नंतर याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा, आणि पुरंदर हे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर नियंत्रण मिळवले.
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. त्याच्यावर “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” असे लिहले होते.
हळूहळू राज्यांनी आदिलशहा, मुघल व निजामशहा यांना धूळ चाटायला लावून त्यांच्याकडून जवळजवळ ३६० किल्ले जिंकले व स्वराज्य विस्तारावले. “शायीस्ते खानाची बोटे कापणे”, “अफजलखानाचा वाघनक्यांनी वध” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.
शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने! तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी या युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेले आहेत, त्यांच्या या सर्व कार्यकिर्तीमुळे मलाच काय पूर्ण महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे.महाराजांवर कविता पहायच्या असतील तर marathicharoli.in ला भेट द्या.
2 Comments