|

{ESSAY} माझे आवडते शिक्षक मराठी निबंध । My Favourite Teacher Essay in Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज आम्ही तुमच्यासाठी ‘माझे आवडते शिक्षक’ [ MAZA AVADTA SHIKSHAK NIBANDH IN MARATHI ] या विषयावर निबंध घेऊन आलो आहोत. तुम्ही हा निबंध तुमच्या आवडत्या शिक्षकाला पाठवू शकता.

निबंध क्र.१

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध

‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’

 असे म्हणत प्रत्येक चुकांसाठी हातावर छड्या मारुन वळ उठवणारे शिक्षकही हल्ली नाहीत. तसे शिक्षणही नाही. त्याचप्रमाणे मार सहन करणारे विद्यार्थीही नाहीत. पूर्वीचे मास्तर धोतर, कोट, टोपी घालून हातात छडी घेऊनच वर्गात प्रवेश करायचे. सर्व वर्ग चिडीचूप होऊन जायचा. मास्तर वर्गातून बाहेर जाईपर्यंत मान वर करुन बोलायची किंवा खोडी काढायची कुणाची हिंमत होत नसे.

फळ्यावर लिहित असताना मधूनच मास्तर चष्म्यातून कुणाकडे पाहू लागले की तो विद्यार्थी थरथर कापू लागे. सरांचे व्यक्तिमत्त्व जसे उठावदार तसे त्यांचे शिकवणेही खूप चांगले असे. जो विषय ते शिकवायला घ्यायचे त्यातच तल्लीन होऊन शिकवायचे. जणुकाही आपणच ती अनुभूती घेत आहोत असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटे. त्यामुळे मास्तरांविषयी आदरयुक्त धाक वाटे.

चव्हाण सर आमच्या गावातील एक प्राथमिक शिक्षक. ते पहिली आणि चौथीचा वर्ग सांभाळत. शाळेतल्या सर्व विषयांबरोबर आम्हाला इंग्रजीही शिकवत. त्यांना इंग्रजीचे खूप सखोल ज्ञान होते आणि ते आम्हाला देण्यासाठी त्यांची धडपड असे. गणित विषय शिकवण्यात त्याचा हातखंडा होता. शाळा सुटायला पंधरा मिनिटे उरली की गुरुजी आम्हाला दप्तर आवरायला सांगून इंग्रजीतून संभाषण सुरु करत. आमचे इंग्रजी उच्चार सुधारण्यावर त्यांचा कटाक्ष असे. त्याचबरोबर आमचे इंग्रजी आणि मराठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे. ते नेहमी म्हणत, “ज्याचे हस्ताक्षर खराब त्याची नियत खराब”. ते स्वतःच सर्व बाबतीत टापटीप असल्यामुळे ते आमच्याकडून तशीच अपेक्षा करत. परवा आमच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात उत्कृष्ट हस्ताक्षराचे बक्षीस मला जाहीर झाले. बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावर जाताना मला आठवण आली ती चव्हाण सरांची.

पेन्सिल, पेन हातात कसा धरायचा हेही ते आम्हाला शिकवत. अक्षरांचा सराव करुन घेत. गुरुजींचे व्याकरणाचे ज्ञानही खूप होते. इंग्रजी-मराठी भाषेतील व्याकरण शिकवणे म्हणजे गुरुजींचा आवडता विषय त्यामुळे आमचे व्याकरण ही पक्के झाले. त्याचबरोबर गणितातील समीकरणे, पाढे, गणितातील सूत्रे ते आमच्याकडून रोज पाठ करुन घेत. कवितांना गाण्याच्या, अभंगांच्या चाली लावून शिकवत त्यामुळे त्या ताबडतोब मुखोद्गत होत. ते आम्हाला रागावत, प्रसंगी शिक्षाही करत पण आमच्या अचूक गणिताला किंवा उत्तराला शाबासकीही देत त्यामुळे सर्व गणिते सोडवून गुरुजींना दाखवण्याची आमच्यात चुरस लागे. मुलांसंगे मूल होऊन शिकवण्याची त्यांची हातोटी आजही आमच्या स्मरणात आहे.

निबंध क्र.२

My Favourite Teacher Essay in Marathi

माझ्या शाळेत बरेच विद्वान शिक्षक आहेत. माझ्या मनात प्रत्येकासाठी खूप आदर आहे. तरीही माझे आवडते शिक्षक श्री शोभारामजी पाठक आहेत. पाठकजी सुमारे पंचेचाळीस वर्षांचे असतील. त्याचा रंग गोरा आहे आणि त्याचा चेहरा रुबाबदार आहे.

 पांढरा कुर्ता आणि पायजमा हा त्यांचा आवडता पोशाख आहे. त्याचा आवाज गोड आहे आणिप्रभावी आहे. त्याची तब्येत पण अजून खूप चांगली आहे.

पाठकजी खूप मजेदार माणूस आहेत. ते एक शांत आणि साध्या स्वभावाचे माणूस आहेत . त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंदाचे भाव असतात. ते शिस्तीवर खूप भर देतात. अनिश्चितता किंवा आळस त्यांच्याकडून सहन होत नव्हता. पाठकजी आम्हाला हिंदी शिकवतात. ते आम्हाला खूप प्रेमाने शिकवातात. ते विषयाच्या खोलपर्यंत पोहचतात. 

पुस्तकातील एखादा कठीण मजकूर किंवा एखाद्या कवितेल देखील ते सोप्या भाषेत समजावून सांगतात. ते भाषेतील व्याकरण शुद्धतेला खूप महत्त्व देतात. शिकवताना ते कधीकधी खूप विनोद करतात.

पाठकजी, आम्च्याशी खूप प्रेमळपणे वागतात. ते गरीब विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना मदत करतात. अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांवर ते विशेष लक्ष देतात. पाठकजी एक चांगले कवी आणि गायक देखील आहेत. नाटक, चर्चा-चर्चासत्र, चित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी इतर उपक्रमांमध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. खरंच, पाठकजी आमच्या शाळेचे एक आदर्श शिक्षक आहेत.

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा माझे आवडते शिक्षक मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *