|

{Essay} माझा आवडता प्राणी उंट मराठी निबंध । Camel information in Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत माझा आवडता प्राणी उंट या विषयावरील मराठी निबंध

Camel information in Marathi । माझा आवडता प्राणी उंट । माझा आवडता प्राणी उंट मराठी निबंध । Maza avdta prani unt marathi nibandh या विषयावर तुम्ही हा निबंध वापरू शकता.

माझा आवडता प्राणी उंट

माझा आवडता प्राणी उंट मराठी निबंध

उंट हा खूप उंच प्राणी आहे. त्याची मानही लांब असते. त्याचे पाय उंच आणि बारीक असतात. उंट हा वाळवंटामध्ये राहणारा प्राणी आहे. वाळूतून भराभर चालता यावे म्हणून त्याच्या पायांचे तळवे पसरट नि गादीसारखे असतात. त्याच्या पाठीवर उंचवटा असतो त्याला मदार असे म्हणतात. त्याचे ओठ जाड आणि रुंद असतात त्यामुळे काटेरी पाने खाताना त्याला त्रास होत नाही. त्याच्या रूपाकडे पाहिल्यास ओंगळवाणे वाटते.

उंट हा खूप उपयुक्त प्राणी आहे. त्याच्या पाठीवर स्वार होऊन तसेच अवजड सामान लादून वाळवंटात प्रवास करता येतो. गाडी ओढण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. उंट अन्नपाण्याशिवाय अनेक दिवस राहू शकतो. म्हणुनच त्याला वाळवंटातील प्रवासासाठी वापरले जाते.

उंटाला खूप लांबून वाळूची वादळे येण्याचे संकेत कळतात. तसेच त्याच्या नाकपुड्या त्वचेच्या घडीने झाकलेल्या असतात त्यामुळे वाळू नाकात जाण्यापासुन त्याचे संरक्षण होते. उंटाचे पाय लांब असल्याने त्याच्या पोटाचे वाळूतील उष्णतेपासुन संरक्षण होते. या सर्व फायद्यांमुळे त्याला ‘वाळवंटातील जहाज’ असे म्हणतात. तो निरुपद्रवी आणि सर्व कामांसाठी उपयुक्त असल्याने वाळवंटात प्रत्येकाकडे असतो.

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा माझा आवडता प्राणी उंट या विषयावरील मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Similar Posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *