{Essay} चांदोमामा वर मराठी निबंध । Essay on Moon in marathi
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत चांदोमामा वर मराठी निबंध
चांदोमामा वर मराठी निबंध | Essay on Moon in marathi | चंद्राचे आत्मवृत्त मराठी निबंध | चंद्र उर्फ चांदोमामा वर मराठी निबंध या विषयावर तुम्ही हा निबंध वापरू शकता.
चंद्र उर्फ चांदोमामा वर मराठी निबंध
चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. तो ठराविक कक्षेतुन पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो परिभ्रमण करताना तो स्वतःभोवती देखील फिरत असतो. चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण काळ एकच असतो त्यामुळे चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरुन कधीच दिसत नाही.
चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. सूर्याचा पृथ्वीवर पडणारा प्रकाश चंद्रावर परावर्तित होत असतो. त्यामुळे निरनिराळी ग्रहणे घडून येतात. चंद्रावर पाणी किंवा हवा नाही त्यामुळे तिथे सजीवसृष्टी नाही. आपण चंद्राच्या निरनिराळ्या कला पाहू शकतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो कलाकलाने वाढत जातो आणि पौर्णिमेला आकाशात पूर्णचंद्र दिसतो. ते दृश्य मनोहर दिसते.
पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तो कलाकलाने कमी होत जातो नि अमावस्येला पूर्ण नाहीसा होतो. त्यादिवशी आकाश काळेकुट्ट दिसते. चंद्रकोर ही मनाला भुरळ पाडत असते. त्यामुळे सुंदर मुलीच्या चेहऱ्याचे वर्णन चंद्रकोरीप्रमाणे केले जाते. चंद्रप्रकाश खूप शांत, शीतल, आल्हाददायक असतो तो सर्वांनाच खूप आवडतो. म्हणूनच बरेच पर्यटक चांदण्यात व चंद्रप्रकाशात सहली आयोजित करत असतात. बरेच हौशी प्रवासी दिवसा आराम करतात आणि रात्री प्रवासाला निघतात. एकलकोंड्या व्यक्तिला सुद्धा फिरण्यासाठी चांदण्यांची सोबत असते.
लहान मुले तर आईने रागावले किंवा मारले की तक्रार चांदोमामाकडे करतात. चांदोमामाच्या सहवासात आपले जेवण करतात आणि चांदोबा डोंगराआड लपला तर अस्वस्थ होतात. स्वप्नात देखील ते चंदामामाच्या राज्यात जाऊन चांदण्यांसोबत खेळून येतात. प्रिय जनांच्या विरहातही चांदोबा त्यांच्या आठवणींची साक्ष देतो.
‘जे न देख सके रवी ते देख सके कवी’ या कवी कल्पना चांदोबाच्या सहवासातच स्फूरतात, सर्वांना चंद्र आपला सखाच वाटतो. विवाहित स्त्रिया त्याला आपला भाऊ मानून आपल्या मनाची व्यथा सांगतात आणि आपली खुशाली आईला कळवायला सांगतात. भाऊबिजेला भाऊ घरी न आल्यास त्या चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अशा या चंद्रावर राकेश शर्मा हा भारतीय अंतराळवीर जाऊन आलाय. आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान आहे.
हे नक्की वाचा :
- ५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध
- पृथ्वीवर मराठी निबंध
- सुर्य मराठी निबंध essay on sun in marathi
तुम्हाला हा चांदोमामा वर मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
This essay is soo good the first thing I like about this essay is this essay is so informative we get to learn much more thing about the moon in this essay