| |

{Essay} हुतात्मा भगतसिंग मराठी निबंध | Bhagatsingh Essay In Marathi

हुतात्मा भगतसिंग मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.

तर आज आपण एका थोर देशभक्त हुतात्मा भगतसिंग यांच्यावर मराठी निबंध बघणार आहोत.
 

हुतात्मा भगतसिंग मराठी निबंध

हुतात्मा भगतसिंग मराठी निबंध

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सरदार भगतसिंगाचा जन्म सध्या

पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील बंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला, वडील

किशनसिंग यांना क्रांतिकारी साहित्य पुरवल्याचा संशय घेऊन इंग्रजानी मंडालेच्या तुरुंगात डांबले होते. अशा या क्रांतिकारी घराण्यात जन्मलेला भगतसिंग सशस्त्र क्रांतिकारकांचा नेता होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. महाविद्यालयीन शिक्षण लाहोरच्या नॅशनल कॉलेज मधून झाले.

कॉलेजमधील वातावरणातच त्यांच्यात क्रांतीवादी विचार रुजले गेले यात त्यांच्या प्राध्यापकांचाच सहभाग होता. त्यामुळे आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढ्यासाठी झटेन अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. पुढे सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतिंद्रनाथ दास इत्यादी कट्टर क्रांतिकारकांच्या साहाय्याने त्यांनी ‘नवजीवन भारत सभा’ ही संघटना उभी केली. तरुणांमध्ये देशभक्तीचे संस्कार करण्याचे काम त्यांनी सुरु केले.

नवतरुण क्रांतिकारींसाठी त्यांनी ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ नावाची नवी संघटना सुरु केली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारतातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ऐवजी भारतात प्रजासत्ताक संघराज्य सरकारची स्थापना करणे हे या गुप्त संघटनेचे ध्येय होते. पुढे ‘डिस्प्यूट बिल’ व ‘पब्लिक सेफ्टी बिल’ हे दोन अन्याय कारक कायदे ब्रिटिश सरकारने मंजूर करुन घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले. त्यावेळी विधानसभेच्या प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या भगतसिंगाने प्रेक्षागृहात कमी शक्तिशाली बाँब टाकून ब्रिटिश सरकारला हादरुन टाकले. परंतु दुर्दैवाने भगतसिंग पकडले जाऊन त्यांच्यावर खटला भरला गेला.

२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या तिघांना वधस्तंभाकडे नेत असताना ‘इन्किलाब झिंदाबाद “क्रांती अमर रहे’ अशा घोषणा देत हसत हसत फासावर गेले. त्या दिवशी मृत्युलाही आपल्या कृत्याची लाज वाटली असेल. ‘चिरायू होवोत असे भारतपुत्र आणि धन्य ती भारत भू’ की ज्या धरतीने अशा वीरांना जन्माला घातले आणि वाढविले.

तुम्हाला हा हुतात्मा भगतसिंग मराठी निबंध या विषयावरील मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

हे पण वाचा  : 

५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध

लालबहादूर शास्त्री मराठी निबंध

महात्मा गांधी मराठी निबंध

झाशीची राणी – लक्ष्मीबाई मराठी निबंध

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *